"जागतिक टपाल दिन"-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 09, 2021, 01:28:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "जागतिक टपाल दिन"
                                        लेख क्रमांक-3
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-09.10.2021- शनिवार आहे. आजचा दिवस "जागतिक टपाल दिन" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

        विश्व टपाल दिन---

     १९७४ मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे 'युनिवर्सल पोस्टल युनियन'ची स्थापना झाली होती. म्हणून आजचा दिवस 'विश्व टपाल दिन' म्हणून साजरा होत आहे.
-- जोसेफ तुस्कानो.

     १९७४ मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे 'युनिवर्सल पोस्टल युनियन'ची स्थापना झाली होती. म्हणून आजचा दिवस 'विश्व टपाल दिन' म्हणून साजरा होत आहे. हा निर्णय टोकियोत १९६९ साली भरलेल्या युनियनच्या परिषदेत घेण्यात आला होता. जगभराची टपाल व्यवस्था सुरळीत नि तत्परतेने चालू राहावी, हा या युनियनच्या स्थापनेमागचा हेतू होता. गेल्या ३५ वर्षांत 'युनेस्को'च्या सहकार्याने प्रस्तूत संघटना या दिवशी तरुण मंडळींसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करते व विश्व टपालदिनी स्पर्धकांना बक्षिस वाटप करते. विविध देशातल्या शाळा-कॉलेजातील मुले स्पधेर्त भाग घेऊन ही बक्षिसे मिळवित असतात. यंदाचे बक्षिस व्हिएतनामच्या शाळेकरी मुलीने पटकाविले आहे.

     जगभरातील देशात टपालाची मुक्त, मोकळी ये-जा व्हावी हे पोस्टल युनियनचे उद्दीष्ट आहे. पूवीर्च्या काळी प्रवासी दूरदूरचा प्रवास करून टपाल वितरण करीत. १६०० ते १७०० च्या काळात अनेक देशांनी एत्रित होऊन आपआपासात करार केले व टपाल वाटपाची योजना आखली. इ.स. बऱ्यापैकी जाळे निर्माण झाले होते. अर्थात, त्यात त्रुटी होत्या, क्लिष्टता होती व भरवंसा नव्हता. 'युनिवर्सल पोस्टल युनियन'ची स्थापना झाल्यावर टपाल व्यवस्थेत लक्षणीय फरक पडला.

     आज टपाल व्यवस्थेला आधुनिकीकरण, नवतंत्रज्ञानाशी स्पर्धा आणि विस्तार या बाबींची दखल घ्यावी लागत आहे. नैरोबीला पोस्टल युनियनची अलिकडेच एक परिषदेत या विषयी तीव्र पडसाद उमटले. पोस्ट खात्याचया उदासीन वृत्तीबद्दल या परिषदेतील चर्चासत्रात टीका झाली. या परिषदेत ११६ देशांतील ५५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. पुढच्या वषीर्ची परिषद कतारला आयोजित करण्यात आली आहे. गतवषीर्चा सोहळा हा पर्यावरणाशी निगडीत होता व त्याची घोषणा होती : 'हरित प्रगतीसाठी टपालसेवेची बांधिलकी' व तत्संबंधी परिषद पोर्तुगालमध्ये भरली होती.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.10.2021-शनिवार.