गंभीर वास्तव चारोळ्या-" कणखर देशा, दगडांच्या देशा, पण आता दरडींच्या देशा !"

Started by Atul Kaviraje, October 09, 2021, 01:50:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  विषय : गावोगावी कोसळणाऱ्या दरडी
                           गंभीर वास्तव चारोळ्या
      " कणखर देशा, दगडांच्या देशा, पण आता दरडींच्या देशा !"
                                  (भाग-2)
    -------------------------------------------------------


(६)
डोईवर गाठोडे, कमरेस पोर
ग्रामस्थ सोडून चाललेत घराला
भविष्य नाही, मार्गक्रमिती पुढला,
"दरडीनी" विळखा घातलाय गावाला.

(७)
"महाराष्ट्राची" स्थिती आजचीच नाहीय
यापूर्वीही बरीच आलीत संकटे
पण सदीतले  प्राण-घातक संकट,
कोसळतंय  डोईवर "दरडींच्या" रूपाने.

(८)
भिंती तुटल्या, छप्पर कोसळले
जीव जाताना डोळ्यांनी पाहिले
संसाराची साऱ्या "राख-रांगोळी" होऊन,
हाती काहीच नाही उरले !

(९)
आभाळ ढगफुटीने बरसत होते
डोंगरमाथा "दरडीनी" कोसळत होता
वरला  ईश्वर खालच्या माणसावर,
क्रोधच व्यक्त करीत होता.

(१०)
"दरडी" काय कोसळतच रहाणार
पूर काय येतच रहाणार
पण म्हणून अवसान गाळायचे ?
खंबीर, नव्याने पुनः उभारायचे !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.10.2021-शनिवार.