म्हणी - "उथळ पाण्याला खळखळाट फार"

Started by Atul Kaviraje, October 10, 2021, 12:06:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"उथळ पाण्याला खळखळाट फार"

                                           म्हणी
                                       क्रमांक -51
                              "उथळ पाण्याला खळखळाट फार"
                             --------------------------------


51. उथळ पाण्याला खळखळाट फार
    -----------------------------

--थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मIरतो.
--अंगी गुण थोडासा पण बढाई खुप मारणे.
--संस्कृतपर्याय - अर्धो घटो घोषमुपैति नूनम्।
- समुद्रIमध्ये प्रचंड पाण्याचा साठा असतो तरीही तो शांत असतो, पण छोट्याश्या ओहोळातील, झर्यातील पाणी वाहताना त्या पाण्याचा भरपूर आवाज होत असतो . रूपक अर्थाने विचार करताना एखादी व्यक्ती जर हुशार आणि बुद्धिमान असेल तर ती व्यक्ती शांत असते आणि मूर्ख /कमी बुद्धिमान माणूस भरपूर बडबड करतो या अर्थाने ही म्हण वापरली जाते .
--काही लोकं करण्यापेक्षा बोलण्यातच जास्त वेळ घालवतात.
--अपरिपक्व ज्ञान असणारा व्यक्ती उगाच ज्ञानप्रदर्शन करतो.
--कमी गुण अंगी असणारा माणूस अधिक बढाई मारतो.
--ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात, तो मनुष्य फार बढाई मारतो.
--ज्ञान थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त असतो .
--अंगी थोडेसे गुण असणाऱ्या माणसाने खूप बढाई मारणे.
--ज्याच्या अंगी गुण थोडा तो जास्त बढाई मारतो.
--वाक्यप्रचार --ज्या ओढ्यामध्ये पाणी थोडे असते त्याच्या प्रवाहाचा आवाज फार होत असतो. उलट खोल पाणी संथ वाहते, त्याला खळाळी नसते
यावरून, जेथे थोडेच असते तेथे गर्जना-गर्व फार. अल्प ज्ञान पण ताठा फार.
--Shallow water makes a great roar.
--A man with fewer points boasts more.
--वाक्य वापर : रिएलिटी शो मधील अनेक स्पर्धक उथळ पाण्याप्रमाणे खळखळाट करीत असतात.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  -------------------------------------------

              उदाहरण दाखल गोष्ट---

     एका गावात एक शेतकरी राहात होता. त्याला एक आठ-नऊ वर्षाचा मुलगा होता. एके दिवशी तो शेतकरी काही कामासाठी आपल्या मुलाला बरोबर घेऊन बाहेरगावी चालला होता. चालता-चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. ती नदी कुठून पार करायची याबद्दल शेतकरी विचार करू लागला तेव्हा त्याचा मुलगा त्याला म्हणाला, "बाबा, जिथून पाणी अगदी संथपणे वहात आहे, तिथून आपण नदी ओलांडू या. कारण जेथे पाण्याचा खळखळाट जास्त चालू आहे तेथे पाणी बरेच जास्त असण्याची शक्यता आहे व तेथून पैलतीराकडे जाणे धोक्याचे देखील ठरू शकते."

     ते ऐकून शेतकरी मुलाला म्हणाला, "बाळ, तू नेमका उलट बोलत आहे. त्याचे असे आहे की, ज्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणच्या ज्ञानाला व विचारांना खोली असते असा माणूस बरोबर मोजकेच बोलत असतो, परंतु त्याउलट उथळ व अविचारी माणसाच्या जिभेचा पट्टा मात्र अखंड चालूच असतो, त्याचप्रमाणे नदीच्या पाण्याचे देखील तसेच आहे. ज्या ठिकाणी पाणी खोल असते, तिथे ते अतिशय संथपणे वाहात असते, तर जिथे ते अत्यंत उथळ असते, तिथे ते खळखळाट करीत असते. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' अशी आपल्यात एक म्हण आहे आणि तिला फार अर्थ आहे.

     बाळा, मी या प्रदेशात बराच फिरलो असल्यामुळे येथील नद्यांची मला सगळी माहिती आहे म्हणून आता आपल्या अंगावरचे कपडे भिजू न देता जर आपल्याला पैलतीरावर जायचे असेल तर आपल्याला त्या खळखळत्या पाण्यातूनच गेले पाहिजे." असे म्हणून ते दोघेही तेथून चालू लागले.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-बेस्ट स्टोरीज ४ ऑल.कॉम)
                ---------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2021-रविवार.