"नवरात्रोत्सव"-दिवस चौथा-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 10, 2021, 01:56:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नवरात्रोत्सव"
                                        दिवस चौथा
                                         रंग नारंगी
                                       लेख क्रमांक-१
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१०.१०.२०२१ -रविवार ,नवरात्रीचा चौथा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्रीची  प्रथा , परंपरा , कथा , गरबा  नृत्य  आणि  बरंच  काही . (आजच्या दिवसाचा रंग नारंगी आहे.)

                   नवरात्रीचे महत्व आणि पुजाविधी----

     आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात. नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे, संपुर्ण नउ दिवस देविची पुजा अर्चा आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देविची अनेक रूपं या नउ दिवसात पुजतात. हिंदु धर्मातील महत्वाचा उत्सव म्हणुन या सणाकडे बघीतले जाते.

     नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत मधे नवरात्री या शब्दाचा अर्थ "नऊ रात्री" असा आहे. या नऊ रात्री आणि दहा दिवशी 9 वेगवेगळया देविंची पुजा अर्चा केली जाते. दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा असल्यानं या दिवसाला साडे तिन मुहूर्तापैकी एक मानले  जातं.

     भारतात आणि नेपाळ मधे साजरा करण्यात येणा.या सणांपैकी नवरात्र हा एक सण आहे. तसच दिवाळी हा प्रकाशाचा आणि उत्साहाचा एक सण आहे जो दस.या नंतर 20 दिवसांनी साजरा केल्या जातो. तसं पाहीलं तर एका वर्षात 5 प्रकारचे नवरात्र येतात त्यात शारदिय नवरात्र सर्वात प्रसिध्द आहे. बऱ्याच  ठिकाणी नवरात्राचा अर्थ शारदिय नवरात्र असाच असतो.

                   नवरात्राची प्रथा आणि परंपरा----
     
मुख्य नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येत असते . तेव्हां भाविक आपल्या आपापल्या कुळाचाराप्रमाणे नवरात्रौत्सवाची स्थापना केली जाते. घरी आणि मंदीरात दुर्गेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करतात देवीला नैवैद्यात फळं आणि फुलं वाहिले जातात. लोक एकत्र येउन आरती, गायन आणि भजनं देखील म्हणतात.

     नवरात्राच्या पहिल्या तीन दिवसांमधे दुर्गेची पुजा केली जाते जीला उर्जा आणि शक्तीची देवता मानल्या जातं. नवरात्रात प्रत्येक दिवसाला आई दुर्गेच्या वेगवेगळया रूपाची पुजा केली जाते. पहिले तिन दिवस त्यांच्या कुमारी, पार्वती आणि काली रूपाचे पुजन करण्यात येतं.

     परंतु साधारणतः पाहिल्यास एका लाकडी काडयांपासुन बनविलेल्या नव्या टोपलीत माती भरली जाते त्यात नऊ प्रकारचे धान्य पेरले जातात. या टोपलीत दहा ही दिवस पाणी टाकल्या जाते. दहा दिवसांमधे संपुर्ण टोपली धानाने हिरवीगार झालेली आणि मातीचा घट त्यामधे झाकुन गेलेला असतो. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेउन त्यात विडयाची पाच पाने ठेवली जातात त्यावर नारळ ठेवला जातो.

     प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते. पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी विडयाच्या पानांची माळ लावण्याची देखील परंपरा आहे. पुजेत पाच प्रकारची फळं ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो. गणपतीची देवीची आणि नवरात्राची आरती म्हंटल्या जाते. सकाळ संध्याकाळ आरती आणि धुप पेटवला जातो.

     देवीच्या घटाजवळ अखंड दिवा दहा दिवसांकरीता लावला जातो. हा दिवा दहा दिवस विझु दिला जात नाही. या दहा दिवसांमधे नऊ कुमारीकांचे पुजन केल्या जाते त्यांचे पाय धुवुन त्यांना भेटवस्तु दिल्या जातात.

     अष्टमीला होमहवन करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो. अनेक ठिकाणी नवमीला नवरात्रीचा कुळाचार असतो तर बऱ्याच ठिकाणी दसऱ्याला देखील कुळाचार असतो. नऊ दिवस देवीला वेगवेगळया रंगाच्या साडया नेसवल्या जातात आणि त्या रंगांप्रमाणे स्त्रिया देखील त्या त्या रंगांच्या साडया परिधान करतांना दिसतात.

     नवरात्रातील नववा दिवस हा या उत्सवाचा शेवटचा दिवस असतो या दिवसाला महानवमी देखील म्हणतात. या दिवशी कुमारिकांचे पुजन केले जाते, नऊ छोटया कुमारिकांना बोलावुन त्यांचे पुजन करण्याची प्रथा आहे. या नऊ कुमारिकांपैकी प्रत्येकीला देवि दुर्गेचे एक रूप मानले जाते.

     या दिवशी या कन्यांचे पाद्यपुजन केले जाते मोठया आदर आणि सन्मानाने त्यांना घरी आमंत्रीत केले जाते. नंतर त्या कन्यांना जेऊ घातले जाते. नंतर भाविक त्यांना नवे वस्त्र आणि भेटवस्तु देखील देतात.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2021-रविवार.