"नवरात्रोत्सव"-दिवस चौथा-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 10, 2021, 01:58:06 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "नवरात्रोत्सव"
                                         दिवस चौथा
                                          रंग नारंगी
                                        लेख क्रमांक-2 
                                     -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१०.१०.२०२१ -रविवार, नवरात्रीचा चौथा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्रीची  प्रथा , परंपरा ,  कथा , गरबा  नृत्य  आणि  बरंच  काही .(आजच्या दिवसाचा रंग नारंगी आहे.)

     अनेक कुटुंबांमधे जोगवा मागण्याची देखील परंपरा आहे त्याप्रमाणे घरातील सवाष्ण स्त्री पाच घरी जाऊन जोगवा मागते. त्यामधे कणीक, तांदुळ, गुळ असे जिन्नस असतात. या मिळालेल्या जोगव्यातुनच कुळाचाराच्या दिवशी स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखविण्यात येतो.

     सार्वजनिक मंडळांमधे मोठया मोठया मुर्तींची स्थापना करण्यात येते. सुरेख असे देखावे तयार करण्यात येतात. पारंपारीक आणि पुराणकाळातील देखावे आकर्षक असतात आणि भाविकांचे लक्ष वेधणारे देखील असतात.

     कोल्हापुर, तुळजापुर, माहुर आणि सप्तश्रृंगी या महाराष्ट्रातील साडेतिन शक्तीपिठांवर या दहा दिवसांमधे भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. भाविक या दिवसांमधे देवीचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे कार्य समजतात.

     नवरात्रात रात्री लोक दांडिया आणि गरबा खेळतात विशेषतः गुजरात मधे लोक मोठया प्रमाणात रासगरबा खेळतात. गरबा आरतीच्या आधी आई दुर्गेच्या सन्मानार्थ खेळल्या जातो, आणि दांडिया आरतीच्या नंतर खेळल्या जातो.

     सप्टेंबर - ऑक्टोबर मधे नवरात्री च्या वेळी नवरात्राचा दहावा दिवस दसरा म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिवशी भाविक सरस्वतीची पुजा करतात आणि आई दुर्गेला मानसिक शांती आणि ज्ञानाचे मागणे मागतात. या दिवशी लंकाधीश असुर रावणाचा पुतळा बनवुन त्याचे दहन केले जाते.

                         नवरात्राची कथा----

     रामायणानुसार प्रभु रामचंद्रांनी देवी दुर्गेला रावणासोबत युध्द होत असतांना बोलवले होते. वसंतऋतु च्या शेवटी दुर्गा देवीची पुजा अर्चना केली जाते. युध्दाची शक्यता पाहाता प्रभुरामचंद्रांनी देवी ला अस्तं महाविद्येने बोलवले होते ज्याला आपण अकाल बोधन या नावाने देखील जाणतो, पण ही पुजा पारंपारिक दुर्गापुजे पेक्षा थोडी वेगळी असते या पुजेला अकाल बोधन असे म्हणतात. जीला आपण कधीही करता येणारी पुजा देखील म्हणतो.

                      नवरात्री गरबा डांस----

     गुजरात इथं गरबा नेहमी नवरात्र, शरद पौर्णिमा, वसंत पंचमी आणि होळी या प्रसंगी खेळला जातो. या सोबतच नवरात्रीच्या नऊ दिवसांमधे आई जगदंबेच्या सन्मानार्थ पारंपारीक संगीत देखील वाजवले जाते. नृत्य साधारणतः महिलाच करतात पण वर्तमान काळात पुरूष देखील यात सहभागी होतांना दिसुन येत आहेत. डान्स करतांना सगळेजणं एक मोठा गोल बनवुन उभे राहातात, गरबा या शब्दाच्या उत्पत्ती मागे देखील बरीच कारणं आहेत. प्राचीन मान्यते नुसार भगवान श्रीकृष्णाच्या वहिनी उषा नेच लास्य नृत्याला लोकप्रीय बनवले ज्याला नंतर गरबा या नावाने ओळखले जाउ लागले.

     गरबाच्या सर्वसाधारण प्रकारात स्त्रिया गरबा खेळतांना डोक्यावर दिवे ठेवतात आणि गोल गोल फेर धरतात, फिरतांना त्या गाणे देखील म्हणतात आणि टाळया देखील वाजवतात. हे नृत्य करत असतांना नेहमी लोकवाद्यांचाच वापर केला जातो. गरबा खेळत असतांना मध्यभागी सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवले जाते त्यावर नारळ देखील ठेवतात जे पवित्र कुंभाचे  प्रतिनिधीत्व करते.

     गुजरात मधे नवरात्रात गरबा हा रात्रीच केल्या जातो. नृत्याचे आयोजन विविध समुह, क्लब आणि समिती करत असतात. गरबा च्या रात्री सगळे सहभागी एका मोकळया जागी जमा होतात. जमा झाल्यानंतर ते गोलाकार आकारात उभे राहातात, मध्यभागी नेहमी दुर्गेची प्रतीमा ठेवण्यात येते.

     नृत्याची सुरूवात मंद संगीताने केली जाते, जसजसे नृत्य पुढे जाते तसतसे नृत्य करणा.यांचा उत्साह वाढत जातो. संगीताला देखील मधे मधे बदलण्यात येतं आणि गरबागीतं वाजवले जातात. नवरात्री गरबा भारतात नृत्याचा सर्वाधीक प्रसिध्द आणि लोकप्रीय प्रकार आहे, या नृत्याला महिला आणि पुरूष दोघेही सोबत करू शकतात. बरेचजणं पारंपारीक गुजराती पोषाख घालुन गरबानृत्य करतात.

     सौराष्ट्रात हे नृत्य करतांना घाघरा चोली आणि ओढणी हा पेहराव असतो. या सोबतच सुरेख आणि आकर्षक आभुषण देखील घालतात. तिथे पुरूष मंडळी शर्ट आणि ट्राऊजर परिधान करतात. अश्या पध्दतीने संपुर्ण भारतात लोक नवरात्राचा उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरI करत आनंदाची देवाणघेवाण करतात.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2021-रविवार.