"नवरात्रोत्सव"-दिवस पाचवा-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 11, 2021, 02:04:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                         दिवस पाचवा
                                           रंग पांढरा
                                         लेख क्रमांक-१
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -११ .१०.२०२१ -सोमवार , नवरात्रीचा पाचवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्रीची  इतर  माहिती  आणि  मंत्र -पठण . (आजच्या दिवसाचा रंग पांढरा आहे.)

                    नवरात्र उत्सव का साजरा करतात?----

     नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे.

यादेवी सर्वेभूतंषू मातृरूपेण संस्थितः II
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः II

     हे जगदंबे, तू सर्व जगाची आई आहे आणि या चराचरामध्ये ज्या स्ित्रया आहेत त्या तुझ्या स्वरूप मातृरूप आहे, त्या जगदंबेला मी साष्टांग नमस्कार करतो.

सर्वमंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके II
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते II

     नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. अशा या नवरात्र महोत्सवाचे माहात्म्य आपण जाणून घेऊ या.

                        नवरात्रात काय करावे?----

     नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते तसेच सप्तशती चरित्रातील हा श्लोक काय सांगतो, ते आपण पाहू या.

प्रथम शैलपुत्री ती, व्दितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चंद्रघण्टेति, कुष्माण्डेती ती चतुर्थकम्।
पंचमं स्कंन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीच महागौरी ति चाष्टकम।
नवमं सिध्दिरात्री च नवदुर्गाः प्रकीर्तीताः।

     या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात. दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चन्द्रघण्टा, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते.

--लेखक-नचिकेत काळे
  --------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.10.2021-सोमवार.