"नवरात्रोत्सव"-दिवस सहावा-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 12, 2021, 01:25:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          "नवरात्रोत्सव"
                                           दिवस सहावा
                                             रंग लाल
                                          लेख क्रमांक-१
                                       ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१२ .१०.२०२१ -मंगळवार , नवरात्रीचा सहावा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती . (आजच्या दिवसाचा रंग लाल आहे.)

           नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती----

     भारतामध्ये नवरात्री उत्सवाला खूप महत्त्व आहे. गणपती उत्सव संपला म्हणजे नवरात्री उत्सव सुरू होतो. पितृपंधरवडा त्या तयारीत कधी संपतो हे आपल्याला कळत नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. त्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.

     मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंददीप लावला जातो. रोज फुलांची माळ सकाळ-संध्याकाळ आरती सार्वजनिक उत्सवातही हे सर्व करून घेतली जातात. घरोघरी ही नवरात्री उत्सवाचे किंवा घटस्थापना होत असते. प्रत्येक घराची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणी देवीची वेगवेगळी रूपे व नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. देवीच्या घटस्थापनेच्या वेळी ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून ही घटस्थापना करून घेतली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन असते.

     तसेच कुणाच्या घरी नऊ कन्या भोजनासाठी बोलावून त्यांची पूजा करून त्यांना हलवा पुरी चुनरी दिली जाते. कुणी धान्य फराळ करतात, तर कोणी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. नऊ दिवस धावपळीचे असतात. त्यासाठीही गोंधळी सुद्धा बोलाविले जातात व संध्याकाळी गोंधळही घातला जातो. नवरात्रीच्या उत्सवाला म्हणजे लोकांमध्ये आनंदी व उत्साहाचे वातावरण आपोआप निर्माण होते. त्यांना उत्सुकता लागलेली असते, या दिवसात प्रत्येक जण देवीची पूजा आरती करण्यासाठी मंडळे स्थापन करून देवीच्या ठिकाणी जात असतात.

                       नवरात्री उत्सवाचे महत्व----

     नवरात्रीचे महत्व आपल्याला देवीच्या विविध रूपांची आराधना करताना मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे. अशा प्रकारे लोकांच्या मनात होणारी म्हणून विकारांची भावना नष्ट करण्याच्या भावनेतून देवीची पूजा व चरणी विलीन होण्यासाठी घटस्थापना करण्यात येते. नवरात्री उत्सवात कोणत्याही प्रकारचा ताण तणाव व्यक्तींच्या मनात किंवा डोक्यावर चेहर्‍यावर दिसून येत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या काळात आनंदी उत्साहाचे वातावरण निर्माण होण्यासाठी नवरात्री उत्सव महत्त्वाचा आहे.

     नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास केले, म्हणजे झाले असे नसून उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार पाप वासना दृष्ट बुद्धी या सर्वांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रीत होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे सामर्थ्याचे दर्शन देवीने दिले तशी शक्ती सामर्थ्य आपल्याला स्वतः मध्ये निर्माण करण्यासाठी या उत्सवाचा व या पवित्र नवरात्रीचा महत्त्वाचा फायदा असतो. नवरात्री उत्सवामध्ये देवी हे एक स्त्रीचीच रूप आहे.

     त्यामुळे समाजामध्ये स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसण्यासाठी म्हणजेच त्यांची पूजा झाल्यामुळे लोकांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर निर्माण होतो व नवरात्रीचे दिवसांमध्ये मुलींची पूजा केली जाते. हाही एक महत्वाचा फायदा आपल्याला दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी मुली जन्माला येण्या अगोदरच त्यांची भ्रूणहत्या केली जाते. त्यामुळे मुलीं जन्माला येऊ द्या असाही संदेश आपल्याला नवरात्री उत्सवातून मिळतो. मुलगी किंवा स्त्री हे एक देवीचे स्वरूप आहे. असे म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जात असावा उद्देश आहे.

--लेखक-प्रमोद तपासे
  ------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                  ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.10.2021-मंगळवार.