"नवरात्रोत्सव"- दिवस सहावा-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 12, 2021, 01:29:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          "नवरात्रोत्सव"
                                           दिवस सहावा
                                              रंग लाल
                                          लेख क्रमांक-2
                                       -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१२ .१०.२०२१ -मंगळवार , नवरात्रीचा सहावा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र सणाचे महत्त्व आणि माहिती . (आजच्या दिवसाचा रंग लाल आहे.)

              नवरात्री उत्सव कसा साजरा करतात----

     नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. नवरात्री हा सण खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी देवीची घटस्थापना झाल्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा केली जाते व टाळ मृदुंगाच्या गजरात देवीच्या आरत्या म्हटल्या जातात. तसेच देवीच्या आरत्या म्हणण्यासाठी गावातील मंडळी आपले स्वतःचे मंडळ स्थापित करत असतात.

     गुजरातमध्ये नवरात्र उत्सव साजरा करताना गरबा आणि दांडिया असा रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. गरबा हा नृत्याचा मोह प्रकार असून त्यात स्त्रिया एक कलशात ठेवलेल्या दिव्या भोवती वर्तुळाकार फेर धरून आकर्षकरीत्या नृत्य करतात. तसेच पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापूजा म्हणून साजरे केले जातात. दुर्गादेवी हाती सारी शस्त्रे घेऊन सिंहावर आरूढ दाखविली जाते.

     तर दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये मित्र, नातेवाईक आणि शेजारच्यांना घरी वेगवेगळ्या बाहुल्या आणि छोटे पुतळे यांचे प्रदर्शन असलेला कुलू बघायला आमंत्रित केले जाते. उत्तर भारतात नवरात्री हा सणसाजरा करत असताना दृष्ट शक्तींवर, सुष्ट शक्तींचा विजय साजरा करण्यासाठी रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे दहन केले जातात. देवी माता तिची निर्मिती असलेल्या आपल्या जीवनातील सर्व रूपे सर्व कला-संगीत आणि ज्ञान या प्रति आपला परम आदर व्यक्त करण्यासाठी नऊ दिवस विशेष पूजा यज्ञ होऊन उपास ध्यान म्हणून गायन, नृत्य या सर्वांनी भरगच्च असतात.

     समस्त मानवजातीला अज्ञान आणि सगळे दृष्ट प्रवृत्ती पासून वाचवणारी तारणहार रक्षण कर्ता म्हणून देवीला पूजले जाते. नवरात्री हा सण विविधतेत एकता निर्माण करून देणारा सण आहे. इथली प्रत्येक गोष्ट अनोखी आहे. मग ती भाषा असो आहार असो संस्कृती असो किंवा आपली वस्त्रे प्रावरणे देखील आपण देशाच्या कोणत्या भागात राहतो, त्यावर ती अवलंबून असते. प्रत्येक ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपापल्या प्रांतानुसार आहेत.

     विदर्भात नवरात्रामध्ये आणखीन देवीचा एक प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे भुलाबाई हा प्रकार आहे. भाद्रपद पौर्णिमेला शंकर पार्वतीच्या मुर्त्या बसून त्यांच्यासमोर शाळाकरी मुली टिपऱ्याच्या तालावर गाणी म्हणतात. शाळेतून मुली घरी आल्याबरोबर हातात टिपऱ्या घेऊन मैत्रिणींच्या घरोघरी जाण्याची त्यांची लगबग गंमतच आपल्याला पाहावीशी वाटते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी टिपूर चांदण्यात भूलाबाई मखरात बसवून त्यांची पूजा केली जाते. पंधरा वर्षांपूर्वी विदर्भात हे असेच घडत असे.

     पण हल्ली शाळांच्या वेळा व क्लासेस यामधून मुलींना वेळ मिळेनासा झालेला आहे. आता केवळ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मुली भुलाबाई बसवत असतात. यामध्ये टिपऱ्याच्या तालावर वेगवेगळी गाणी म्हटली जातात. तसेच दररोज नवीन नवीन प्रसाद म्हणून भातकूल जिंकण्याची प्रथाही यामध्ये असते आणि प्रत्येकाच्या घरी मुली ह्या दररोज नवीन प्रसादाची निवड करत असतात. देवीला खिरापत ठेवले जाते आणि नंतर मुलींना हा प्रसाद वाटला जातो. नवरात्री सणाची अशीही गंमत पहायला मिळते.

                नवरात्र उत्सवा निमित्त पौराणिक कथा----

     नवरात्री या सणामध्ये माता दुर्गाचे नऊ रूपांची पूजा केली जाते. या बद्दल एक पौराणिक कथा आहे. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव पडले आहे. तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते.

     वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पुजली जाते. या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः असेच म्हटले जाते. तसेच "सर्व मंगल मांगल्ए शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते" अशीही तिची प्रार्थना केली जाते.

     अशाप्रकारे नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने दरवर्षी पार पाडला जातो.

--लेखक-प्रमोद तपासे
  ------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                  ------------------------------------------


                                          रंग  नवरात्रीचे
                                              कविता
                                         ---------------


रंग  लाल  सभोवती
असा  काही  खुले
जगताच्या  बागेत  जणू
उमलली  जास्वंदाची  फुले.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-चित्रकविता.कॉम)
                   ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.10.2021-मंगळवार.