"१२ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 12, 2021, 11:14:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.१०.२०२१-मंगळवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१२ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                    --------------------------


अ) १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
    -------------------------------

१४९२: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.

१८२३: स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.

१८४७: वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.

१८५०: अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.

१८७१: भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

१९०१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.

१९६०: संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.

१९६८: मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९८३: लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.

१९८८: जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.

१९९८: तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.

२०००: भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.

२००१: संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्‍नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२००२: दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.

=========================================

ब) १२ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   -----------------------------

१८६०: गॅरोकोम्पास चे निर्माते एल्मर अॅम्ब्रोस स्पीरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९३०)

१८६४: बंगाली कवी, समाजसेवक आणि ब्रिटीश भारतातील स्त्रीवादी तसेच ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९३३)

१८६८: ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

१९११: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९८७)

१९१८: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)

१९२१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१)

१९२२: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून २००२)

१९३५: भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.

१९४६: क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

=========================================

क) १२ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१९६७: समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१०)

१९९६: फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ते यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९०४)

२०११: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रितची यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९४१)

२०१२: भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९३१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.10.2021-मंगळवार.