"आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 12:21:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    "आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"
                                        लेख क्रमांक-2
                  --------------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक १३ .१०.२०२१-बुधवार आहे. आजचा दिवस "आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

                              आपत्ती व्यवस्थापन---

         आपत्ती म्हणजे काय ? किवा आपत्ती कशास संबोधता येईल?---

      आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात.

आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ? ( आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत?---

          आपत्ती व्यवस्थापनाचे 3 प्रमुख टप्पे आहेत---

आपत्ती पूर्व व्यवस्थापन - यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे

आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे.

आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे,इत्यादि
नैसर्गिक आपत्ती

     परिसर भूकंप, ज्वालामुखी, वादळवारे, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती माणसाला पुरत्या हतबल करून टाकतात. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते. या आपत्तींना तोंड देण्यासाठी विशेष प्रशिक्षणांनी युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑक्टोबर महिन्याचा दुसरा बुधवार राखून ठेवतात व या आपत्तींना आवर घालण्यासाठी करावयांच्या कारवायांची उजळणी करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २२ डिसेंबर १९८९ च्या सर्वसाधारण अधिवेशनात नैसर्गिक आपत्तींना आवर घालण्यासाठी प्रस्तुत दिवसाची घोषणा झाली होती. १९९०-९९ हा काळ नैसर्गिक आपत्तींना आवर घालण्याचे दशक म्हणून घोषित झाले होते व या काळात सदर दिवसाचा सोहळा ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या बुधवारी साजरा होत गेला.

लेखक - रामदास  हेडगापुरे 
-------------------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टडी .ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.