"आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 12:24:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    "आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"
                                         लेख क्रमांक-3
                  --------------------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक १३ .१०.२०२१-बुधवार आहे. आजचा दिवस "आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

    नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरच्या कितीतरी लोकांची घरेदारे नष्ट झाली आहेत. जीव प्राणास मुकले आहेत. काही आपत्तींमुळे तर देशांचा आर्थिक कणाच मोडून टाकला आहे. त्यासाठी या आपत्तीसंबंधी लोकांना शिक्षित करावे, माहितीची देवाणघेवाण व्हावी, या परिस्थितींना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळावे याची संयुक्त राष्ट्रसंघाला प्रकर्षाने जाणीव झाली. यासाठी राष्ट्रकुलाने तयार केलेल्या बोधचिन्हात पृथ्वीवरील आपत्तीग्रस्त देश व त्यांच्याभोवती शांतीच्या दर्शक असलेल्या ओलिव्ह वृक्षाच्या फांद्या दाखविलेल्या आहेत. सर्वसाधारण लोकांत सुरक्षिततेची भावना रुजावी, आपत्तीग्रस्त लोकांना त्वरीत आर्थिक, वैद्यकीय मदत मिळावी, आपत्तीच्या काळात नीट व्यवस्थापन व्हावे या उद्दिष्टांनी प्रस्तुत दिवसाचे प्रयोजन असते. दुर्दैवाची बाब म्हणजे जगातली गरीब लोकं या नैसर्गिक आपत्तीचे हमखास बळी होत. अलिकडच्या काळातले त्सुनामी संकट, ज्वालामुखी, भूकंप ही त्याची ताजी उदाहरणे होत. या दिवसासंबंधी जागृती व्हावी यासाठी देशोदेशीची सरकारे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून एखादी घोषणा उद्यृत करतात व त्याची कारणमीमांसा जनतेला स्पष्ट करतात.

     चित्रकला, निबंध, फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांत तसेच नागरिकांमध्ये आपत्तीकाळात कसा प्रतिसाद द्यायचा यासंबंधी चालना देणारे धडे गिरविले जातात. सभापरिषदांतून भूतकाळातील घटनांतून मिळालेले धडे प्रशिक्षणार्थ वापरले जातात. छोट्या छोट्या गटांना एकत्रित करून अल्प अर्थ सहाय्य करण्याची व त्याद्वारा उद्ध्वस्त झालेली जीवने उभारण्याची संकल्पना खूप उपयोगी ठरल्याचे दिसून आले आहे. तिचे महत्त्व या दिवशीच्या उपक्रमातून सकलांना पटवून दिले जाते. संयुक्त राष्ट्रसंघाचे कॅपिटल डेव्हलप फंड आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स ऍन्ड सोशल अर्फेअर्स या शाखा हातात हात घालून या सोहळ्याचे जगभर नियोजन करीत असतात. लंडनच्या रॉयल सोसायटीत आजच्या दिवशी भलीथोरली परिषद आयोजित करून या विषयाशी निगडित विविध बाबींचा उहापोह होत आहे. शेवटी काय तर, झीर्शींशपींळेप ळी लशींींशी ींहरप र्लीीश हेच तत्त्व याकामी जास्त कामाला येत असते.

                 आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग---

     मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो जर एखाद्या वाहनाला फार मोठा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाली तर त्यांना उपचारासाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी समाजातील अनेकजण धावपळ करतात. एकंदरित सांगावयाचे झाल्यास मानवी संवेदनामुळेच ही सकारात्मक कृती समाजाकडूनच घडते तसेच यामध्ये प्रशासनाच्या वतीनेसुध्दा योग्य ती दखल घेतली जाते, म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे.

     भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर केंद्र शासनाने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे. याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे.

लेखक - रामदास  हेडगापुरे 
------------------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टडी .ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.