"आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"-लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 12:28:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  "आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस"
                                         लेख क्रमांक-5
                -------------------------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक १३ .१०.२०२१-बुधवार आहे. आजचा दिवस "आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

     आपतकालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदीचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपतकालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरीरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे.

     आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच Disaster Management . हा एक अत्यंत मोठा आणि व्यापक विषय आहे. ह्या विषयावर इंटरनेटवर शोधायला गेल्यास असंख्य पुस्तके, लेख आणि websites मिळतील. ह्या सगळ्याचा इत्भूंत आढावा घेणे तसे अशक्य आहे. तरी देखील आपण व्यवहारात आवश्यक जुजबी माहिती मिळवण्याचा प्रयास नक्कीच करु शकतो जेणे करून आपत्ती सारख्या बिकट परिस्थितीत आपण मार्ग काढून आपले प्राण वाचविण्याचे प्रयत्न नक्की करू शकतो.

     तहान लागल्यावर विहीर खणायला गेले तर काय होईल हे आपण सारे जाणतोच. मग तहान लागण्याआधी जशी पाण्याची सोय करणे श्रेयस्कर असते तसेच आपत्ती आल्यावर जीव वाचविण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा , उपाय शोधण्यापेक्षा संकट निवारणाची उपाय योजना आधी पासूनच आखणे आणि त्याची पूर्वतयारी करून ठेवणे कधीही उचितच असेल, नाही का बरे ?     

       चला तर मग आपती व्यवस्थापन म्हणजे काय असते ह्याची माहिती घेऊ या---

     Prevention is betther than cure ही गोष्ट आपणा सर्वांनाच मान्य आहे. कोणताही अपघात घडण्याआधी तो घडू नये म्हणून घेतली गेलेली खबरदारी, सावधानता ही कधी ही हितावहच असते. जसे अपघात म्हणता क्षणी नजरेपुढे प्रथम लक्षात येते तो प्रथमोपचार.आपण सर्वजण प्रथमोपचार म्हणजे First-Aid ह्या बाबत जाणतोच की अपघात वा दुर्घटना प्रसंगी वैद्यकीय मदत मिळण्याआधी त्या जखमेचे संभाव्य परिणाम वा त्यापासून उद्भवणारे धोके कमी करण्यासाठी केले जाणारे सोपे उपाय. जसे भाजल्यावर जखम झालेला शरीराचा अवयव वेदना शमविण्यासाठी थंड पाण्याखाली धरणे वा रक्त प्रवाह थांबविण्यासाठी हळद वापरणे इत्यादी... अगदी तसेच थोडक्यात सांगायचे तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपतींपासून उद्भवणारे जीवित हानी, वित्त हानी, सामाजिक हानी अशा सर्वच पातळींवरील दुष्परिणाम अभ्यासून शक्य तेवढ्या प्रमाणात होणारी हानी कमी करण्यासाठी योजले जाणारे विवीध उपाय आणि उपाय योजना .

     आपल्या भारतात तसे पाहिले तर एकाच वेळेस दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी,चक्रीवादळ, आगी, जातीय दंगे, दहशतवाद अशा विवीध प्रकारच्या आपती आढळतात.

     साधारणपणे आपत्तींचे नैसर्गिक आपत्ती - दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी,चक्रीवादळ इत्यादी.  मानवनिर्मीत आपत्ती - आगी, जातीय दंगे, दहशतवाद इत्यादी.   
असे वर्गीकरण केले जाते.

     आपला भारत देश हा नैसर्गिक आपत्ती येणारा जगातील सर्वात मोठा देश समजला जातो. अंदाजे भारतात दरवर्षी ५० % भागात भूकंप , ३०% भागात दुष्काळ, १० % भागात पूर येत असतो. तसेच विवीध प्रकारच्या जातीय दंगली, दहशतवाद , आगी ह्या सुध्दा वारंवार घडताना दिसतात.

     कोणत्याही प्रकारच्या आपत्ती आल्या की आज आपण सगळे शासनाला दोष देण्यात धन्यता मानतो. परंतु आपण जर एक समजंस नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून वागायला लागलो तर खूप प्रमाणात गोष्टी बदलू शकतील.

लेखक - रामदास  हेडगापुरे
-------------------------

              (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्टडी .ब्लॉगस्पॉट.कॉम)
            ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.