"नवरात्रोत्सव"-दिवस नववा-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 15, 2021, 01:21:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            "नवरात्रोत्सव"
                                             दिवस नववा
                                              रंग जांभळा
                                            लेख क्रमांक- 2
                                         -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१५ .१०.२०२१ -शुक्रवार,  नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज  देवी  विसर्जनाचा  दिवस  आहे . मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र सणाच्या  नऊही  दिवसांची  इत्यंभूत  माहिती . (आजच्या दिवसाचा रंग जांभळा आहे.)

     महाराष्ट्रात आज गावोगाव 'दसरामाळ' आहे. या माळावर चिवाटयांच्या बंदीस्त चौकात गावचा गुरव भल्या पहाटेच आपटयाच्या किंवा शमीच्या फाद्यांचे ढिग आणून रचतो. संध्याकाळी गावच्या तालेवार मानकऱ्याकडून हा 'सोनचौक' सर्व प्रथम फोडला जातो. मग गावकऱ्यांची चौकातील सोन लुटण्यासाठी तिथ झुंबड उडते. हाती लागतील ते ठाळे अपूर्वान हाती वागवीत गावकरी गावाच्या ग्रामदैवताला प्रथम सोन वाहतो. मग आपल्या सर्व गावबंधुंना हे सोन देण्यासाठी त्याचा मित्रगणांसह ग्रामदौरा सुरू होतो. शेमल्यात पिवळयाजर्द कोभांचे तुरे रोवलेले शिवरायांचे मऱ्हाटमोळे ग्रामीण एकमेकांना हातच्या सोन्याची पान देतांना हटकून म्हणतात.-सोन घ्या-सोन्यासारख- ऱ्हावा। आमच सोन सांडू नगा । आमच्यासंग भांडू नगा। ' ते एकमेकांना निकोप गावरान प्रेमा देत उराउरी भेटतात. त्यावेळी त्यांच्या फेटाच्या शेमल्यात खोवलेले देखणे कोंभ लयीत मागेपुढे उठतात. ते बघतांना खरा महाराष्ट्र खळतो.

     शिवकाळापासून 'सिमोल्लंघनाला' फार महत्व आल. मावळे सैनिक जवळजवळ सर्वच शेतकरी होते. ते आपआपल्या गावाकडे पावसाळाभर शेतकामात राबत.

     पावसाळा संपला की, मळणी, आबादानी आवरून मावळा आपल्या बुद्रक, खुर्द वस्तीची शिव (सीमा) ओलंडून निघे. त्याच्या कमरेला तलवार असे, हाती भाला पेललेला असे, पाठीवर ढाल आवळलेली असे. आता तो शिवरायांच्या सेनेचा 'धारकरी' असे, हे सीमोल्लंघन तो विजयादशमीच्या सोनवाणाच्या मुहूर्तावर करे. आता त्याला 'जिकडं पूढा-तिकड मुलूख थोडा.' अस.
     
     मैसूरात दस-याच्या या दिवशी नाना रंगी झुली पांघरलेले शेकडो हत्ती 'दसरा मिरवणूकीसाठी' रस्त्यावर येतात. बंगालात फक्त दुर्गापूजा व तिच स्तवन यासाच महत्व असत.

     महाराष्ट्रात विजयादशमीचा मुहूर्त धरून गावाची सीमा ओलांडण्याचा विधी आजच करायचा असतो हे प्रतीक पराक्रमाच आहे.

     तशी वर्षभरात आणखीही चार नवरात्रे लोक संपन्न करतात.

     पण महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकांसमोर नऊ रोज नऊ माळा टांगून, विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोन वाटतो. दुस-या दिवशीच पाठीला खंडेनवमीची पूजलेली हत्यार पेलत नवरात्रीची कात चाकून विजयादशमीचे पराक्रमाचे नवकोंभ मिरवत-सीमोल्लंघन करतो हे आगळ वेगळ वाटत नाही काय? नक्कीच वाटेल सशक्त मनोबैठक असेल तर तशी दृष्टी असेल तर.

                  दसरा – सीमोल्लंघन (आश्विन शुध्द दशमी)----

     नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरूध्द राक्षसांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.

     या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युध्द करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्त्व आहे. उत्तरभारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटयाच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात.

     या दिवशी घरातील कर्त्या पुरूषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीने अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी साम्राज्य वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.

     या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवरल्ड.कॉम)
               --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2021-शुक्रवार.