आंदोलन चारोळ्या - "दगडाला दुधाचा अभिषेक केला, त्यात आम्ही देव पाहीला !"

Started by Atul Kaviraje, October 15, 2021, 01:38:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                विषय : दगडाला दुधाचा अभिषेक करून आंदोलन
                         वास्तव मार्मिक आंदोलन चारोळ्या
            "दगडाला दुधाचा अभिषेक केला, त्यात आम्ही देव पाहीला !"
                                      (भाग-2)
          -------------------------------------------------------


(६)
"दगडावर" अभिषेकाची संततधार चालली होती
शंकराची पिंडी रिक्त खिन्न होती
तिला तिचे "दुधाळ" दिवस आठवले,
क्षणभर का होईना, मन तिचे पांढुरले, शुभ्राळले.

(७)
देवळातल्या घंटांची  घणघण थांबली होती
देवाची दान-पेटी भकास उरली होती
देवळाची साऱ्या रयाच निघून गेली होती,
"दगडाला" "दुधाचे" शुभ्र तेज चढले होते.

(८)
आंदोलन वाढतच चालले होते जगभर
"दगडांना" मागणी येत होती भराभर
"दगड" "दुग्धाभिषेक" होत होते सरासर,
नवलंच पाहावयास मिळत होते धरतीवर !

(९)
प्रस्थ वाढतच होते कोरोनाचे जगभर
देवाचे विस्मरणच झाले होते वर्षभर
देवळाच्या कुलुपाला गंज चढला होता,
आंदोलनकारी "दगडाला" "दुग्धाभिषेक" करून थकला होता.

(१०)
LOCKDOWN लागून एक तप उलटले होते
देवालय देवाचे आजही बंद होते
बारा-वर्षांत "दगड" चांगलाच पोसला होता,
भक्तांना "दगड"-देव आकर्षित करीत होता.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2021-शुक्रवार.