"१५ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 15, 2021, 11:06:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.१०.२०२१-शुक्रवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१५ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                    -------------------------


अ) १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१८४६: अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.

१८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.

१९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

१९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

१९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९७५: बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.

१९८४: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९३: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.

१९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.

=========================================

ब) १५ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   -----------------------------

१५४२: तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)

१६०८: इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १६४७)

१८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

१८८१: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.

१९०८: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल २००६)

१९२०: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९९९)

१९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

१९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

१९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

१९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

१९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

१९५५: भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.

१९५७: भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.

१९६९: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.

=========================================

क) १५ ऑक्टोबर झालेले मृत्यू.
   -------------------------

१७८९: उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

१७९३: फ्रेंच राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१९१७: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)

१९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.

१९३०: डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८६६)

१९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

१९४६: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९३)

१९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

१९८१: इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.

१९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

२००२: प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.

२००२: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९२३)

२०१२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2021-शुक्रवार.