"ईद-ए-मिलाद-उन-नबी" - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 19, 2021, 03:22:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "ईद-ए-मिलाद-उन-नबी"
                                            लेख क्रमांक-3
                                    -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.१०.२०२१-मंगळवार आहे. आज "ईद-ए-मिलाद-उन-नबी" हा मुस्लिम बांधवांचा सण साजरा केला जात आहे. मराठी कवितेच्या माझ्या साऱ्या मुस्लिम कवी-कवयित्री भाऊ-बहिणींना या सणांच्या मनःपूर्वक अनेक शुभेच्छा. " ईद-ए-मिलाद " मुबारक हो. चला, तर जाणून घेऊया, " ईद-ए-मिलाद " चे महत्त्व, लेख, आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती.

                    ईद-ए-मिलाद बद्दल माहिती---

     ईद-ए-मिलाद धार्मिक महत्त्व ईद-ए-मिलाद हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. दिवसाचे महत्त्व : इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून या सणाला फार महत्त्व प्राप्त झाले.

     धर्मीयांमध्ये बासी ईद साजरी केली जाते. या दिवशी आपल्या इतर धर्मांमध्ये ज्या पद्धतीने विविध सण साजरे केले जातात, त्याप्रमाणेच इस्लाम धर्मामध्ये ईद, बकरी-ईद, मोहरम हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

     हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत. या दिवशी मुस्लीम लोक नवीन कपडे घालतात व मशिदीमध्ये जाऊन नमाज पढतात. नंतर मित्रमंडळी व नातेवाईकांना भेटून शुभेच्छा देतात.

     मुस्लीम धर्मगुरू मशिदीत प्रवचन देतात. इतर महत्त्व : या दिवशी मुस्लिम बांधव घरी वेगवेगळे गोड पदार्थ तयार करतात. त्या पदार्थांत "शिर खुर्मा" हा महत्त्वाचा पदार्थ असतो. इतर धर्मातील लोकांना घरी बोलावून त्यांना गोड पदार्थ खाण्यास देतात.

     इतर धर्मीय लोक 'ईद मुबारक' असे म्हणून त्यांना या सणाच्या शुभेच्छा देतात. ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम नातेवाईकांना व घरातील सर्वांना घेऊन बागबगीचामध्ये जातात व तेथे एकत्र जेवण करतात.

     या सणानिमित्त समाजातील इतर लोकही सहभागी होतात; त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता दृढ होण्यास मदत होते. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर' यांचा मृत्यूही याच दिवशी झाला, हा एक योगायोगच म्हणावा लागेल; इस्लाम धर्मीय लोक ईद- ए-मिलाद हा सण आनंदाने साजरा करतात.


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगुरु.इन)
                      ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2021-मंगळवार.