"कोजागिरी पौर्णिमा" - लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, October 19, 2021, 04:30:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "कोजागिरी पौर्णिमा"
                                            लेख क्रमांक-2
                                       --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.१०.२०२१-मंगळवार आहे. आज "कोजागिरी पौर्णिमा" आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री, भाऊ-बहिणींना, या कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेऊया, कोजागिरी पौर्णिमेची माहिती, महत्त्व, लेख, कथा, पूजाविधी, कविता आणि इतर बरंच काही.

                        कोजागिरी पौर्णिमा माहिती---

     'कोजागिरी.... हू जागिरी'....म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध, सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल पण कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो.  हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला 'शरद पौर्णिमा', 'माणिकेथारी', 'नवान्न पौर्णिमा' , कौमुदी पौर्णिमा, 'माडी पौर्णिमा' असे देखील म्हणतात.  कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी (Kojagiri Purnima Mahiti Marathi), कोजागिरी पौर्णिमेचे महत्व (Importance Of Kojagiri Purnima In Marathi) जाणून घेऊया. शिवाय हा सण नेमका कसा साजरा करायचा ते देखील जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करु शकता.

======================
कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
कोजागिरी पौर्णिमा कथा
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात
======================

                 कोजागिरी पौर्णिमेचे महत्व---

     कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. यासाठीच जाणून घेऊया  कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय आणि कोजागिरी पौर्णिमा माहिती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते.

     प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र आलेली असते. या नऊ दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात.  पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.

     कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे.  दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

     कोजागिरी पौर्णिमेचे महत्व जाणून घेतल्यानंतर ती कधी येते हे जाणून घेऊ. कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा म्हणजेच 2021 मध्ये ही कोजागिरी पौर्णिमा  19 ऑक्टोबर रोजी आली आहे. पौर्णिमेचा प्रारंभ हा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी सुरु होणार आहे. पूर्ण चंद्र आल्यानंतर तुम्ही चंद्रासमोर मसाला दूध ठेवून त्याचे सेवन केले जाते. लक्ष्मी पृथ्वीतलावर येणार याचे स्वागत करण्यासाठी जागे राहण्याची फार पूर्वी पासूनची परंपरा आहे.

लेखिका -लिनल  गावडे
---------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम )
               -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2021-मंगळवार.