"कोजागिरी पौर्णिमा" - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 19, 2021, 04:32:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          "कोजागिरी पौर्णिमा"
                                             लेख क्रमांक-3
                                        --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.१०.२०२१-मंगळवार आहे. आज "कोजागिरी पौर्णिमा" आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री, भाऊ-बहिणींना, या कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. चला तर जाणून घेऊया, कोजागिरी पौर्णिमेची माहिती, महत्त्व, लेख, कथा, पूजाविधी, कविता आणि इतर बरंच काही.

                     कोजागिरी पौर्णिमा कथा---

     कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी काही कथा जाणू घेऊया. म्हणजे तुम्हाला कोजाागिरी पौर्णिमेचे महत्व जास्त कळेल.

                          कथा 1---

     एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते. एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी  राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाला आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत माागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरुन साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वीतलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात 'अमृतकलश' घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते 'को जार्गति? को जार्गति?' तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान, वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साद देतात तिला ही सुखसमृद्धी मिळते.

                          कथा 2---

     फार फार वर्षांपूर्वीची गोष्टी मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरिब ब्राम्हण राहात होता. जो एवढा सज्जन होता. त्याची पत्नी तितकीच दृष्ट होती. ब्राम्हणाच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती. गरिबीमुळे त्रासलेल्या ती पत्नी ब्राम्हणाला नको नको ते बोलत होती. पतीच्या विरोधातील त्याचे आचरण पाहून त्याला त्रास होत असे. चोरी सारख्या वाईट कामांसाठीही  ती त्याला प्रवृत्त करु लागली.  एकदा एक पूजा करताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली. चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राम्हणाने जंगलात निघून जाणे पसंत केले. जंगलात गेल्यावर त्यांना काही नागकन्या भेटल्या त्यांनी त्या गरिब ब्राम्हणाला  त्या दिवसाचे महत्व सांगितले. तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा होती.  तिने ब्राम्हणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले.  त्याने विधीवत कोजागरी व्रत केले. त्याला सुख-समृद्धी मिळाली.लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्धी झाली. त्यांचा संसार सुखाचा झाला.


                   कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करतात---

     कोजागिरी पौर्णिमेचे महत्व जाणून तुम्ही तो दिवस नेमका कसा साजरा करायचा याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या दिवसाचा पूजाविधी.

     पूजाविधी :-- या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची खूप ठिकाणी पद्धत आहे. यासाठी तुम्ही स्वच्छ स्नान करुन घ्या. उपवास ठेवा.  तांब्याच्या, चांदीच्या किंवा मातीच्या कलश्यावर वस्त्राने झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी आणि मनोभावे पूजा करावी. चंद्रोदय झाल्यावर  तूपाचे दिवे लावावेत.  दूध, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून खीर बनवावी. ती चंद्र प्रकाशात ठेवावी त्यानंतर अशी खीर प्रसाद म्हणून ब्राम्हणास द्यावी आणि आपणही ग्रहण करावी .

     कोजागिरीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. घरी मस्त मसाला दूध बनवले जाते. सुकामेव्यात आटवलेले गोड दूध चंद्रप्रकाशात न्हाऊन काढले जाते. मग ते प्राशन केले जाते. मंगलमय गाणी,रास गरबा करुन ही रात्र जागवली जाते.

     अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करु शकता आणि या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

लेखिका -लिनल  गावडे
---------------------

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम )
               -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2021-मंगळवार.