"जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस"-लेख क्रमांक - १

Started by Atul Kaviraje, October 20, 2021, 11:13:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस"
                                          लेख क्रमांक - १         
                            ------------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-२०.१०.२०२१-बुधवार आहे. आजचा दिवस "जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

                  October 20---World Osteoporosis Day

"To raise global awareness of the prevention, diagnosis and treatment of osteoporosis and metabolic bone disease."

    तुमच्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतो हाडांचा 'हा' गंभीर रोग.

     तुमची हाडं मजबूत होत आहेत, त्यांना शक्ती मिळाली आहे हे प्रत्यक्ष पाहता येत नसलं, तरी हाडांची शक्ती वाढली आहे हे खेळ खेळताना, व्यायाम करताना नक्कीच लक्षात येऊ शकतं. त्यासाठी सक्रीय राहणं आवश्यक आहे.

     ओस्टिओपोरोसिस हा आजार हाडं कमकुवत करतो. या आजाराची तीव्रता हळूहळू वाढत जाते आणि हाडं नाजूक होऊ लागतात. विशेषत: महिलावर्गाला हा आजार जाणवतो, कारण वयाच्या ३० व्या वर्षानंतर त्यांच्या हाडांची घनता कमी होऊ लागते. साधारणपणे तीनपैकी एका महिलेला आणि बारापैकी एका पुरुषाला ओस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडांना फ्रॅक्चर होण्याच्या वर्षभरात सरासरी २ लाखांहून अधिक घटना घडतात.

     गुणसूत्रांमुळे, मेनोपॉझमुळे आणि वंशपरंपरेनं चालत आलेला ओस्टिओपोरोसिस रोखणं कठीण आहे; पण तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणत, हाडांची शक्ती, घनता वाढवू शकता.

              त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा विचार करा---

० शरीराचं वजन योग्य प्रमाणात ठेवा. तुमचं वजन जास्त असेल किंवा खूप कमीही असेल, तर ओस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता अधिक असते.
० हाडं मजबूत होण्यासाठी नियमितपणे व्यायाम आणि पुरेशा प्रमाणात पोषण मिळणं आवश्यक आहे.
० अतिरिक्त कॉफिन, मद्यपान, धूम्रपान करण्यामुळे कॅल्शियमचा पुरेसं मिळत नाही. त्यामुळे हाडांना नुकसान पोहोचू शकतं.

          मजबूत हाडांसाठी व्यायाम का महत्त्वाचा?---

     नियमित व्यायाम केल्यामुळे हाडं मजबूत होतात. व्यायामामुळे हाडांची शक्ती वाढते, तग धरण्याची क्षमता वाढते आणि हाडांची घनताही वाढते. आपल्या शरीराला आकार देणाऱ्या मानवी सापळ्यामध्ये २०६ हाडं असतात. हाडांना कॅल्शियमची आवश्यकता असते. योग्य त्या पोषणातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. योग्य प्रकारे नियमित व्यायाम केल्यानं कॅल्शियम शोषून घेण्याची हाडांची क्षमता वाढते.

                 कोणता व्यायाम हाडं मजबूत करतो?---

     दोन प्रकारचा व्यायाम हाडांसाठी उपयुक्त ठरतो. वजन उचलणं आणि प्रतिकारशक्ती प्रशिक्षण व्यायाम. वजन उचलण्याच्या व्यायामात (वेट बेअरिंग एक्सरसाइज) हाडं आणि स्नायू गुरुत्वाकर्षणाविरुद्ध काम करण्याच्या व्यायामप्रकारांचा समावेश असतो. उदा. चालणं, धावणं, जिने चढणं, नृत्य, टेनिस खेळणं, गोल्फ खेळणं आणि फुटबॉल खेळणं. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामामध्ये हाडं आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उदा. मशीनचा वापर करून वेट ट्रेनिंग एक्सरसाइजेस, फ्री वेट अथवा बॉडी वेट.

--तुमच्या हाडांना शक्ती मिळतेय का हे तुम्हाला कळू शकत नाही.
तुमची हाडं मजबूत होत आहेत, त्यांना शक्ती मिळाली आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येत नाही हे खरं असलं, तरी तुमच्या हाडांची शक्ती वाढली आहे हे तुम्हाला खेळ खेळताना, व्यायाम करताना नक्कीच लक्षात येऊ शकतं. उदा. तुम्ही टेनिस खेळता तेव्हा, हाडांची शक्ती वाढली आहे हे तुम्हाला जाणवू शकतं. खेळताना किंवा खेळल्यानंतर जाणवणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी-जास्त होण्यावरून हे तुमच्या लक्षात येतं.
--जे स्वत:चा फिटनेस राखून आहेत, अॅथलेटिक्समध्ये आहेत, त्यांनाच वेट बेअरिंग एक्सरसाइजची गरज आहे.
--वेट बेअरिंग एक्सरसाइज हे सगळ्या पातळीवरील तंदुरुस्तीच्या पातळ्यांवर आणि सर्व वयोगटांसाठी आहे. सगळ्यांत सोपा वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणजे चालणं. हाडांचा विकास होण्याकरता हा सोपा व्यायामप्रकार आहे.

                  हाडांसाठी योग्य आहार---

                             कॅल्शियम---

--अनेक महिला, मजबूत हाडांसाठी जेवढं कॅल्शियम आवश्यक आहे त्या तुलनेत जवळपास निम्मं कॅल्शियमच मिळेल असा आहार घेत असतात. हाडांना कॅल्शियमची गरज तुमच्या वयानुसार बदलू शकते; पण दिवसाला सर्वसाधारणपणे १००० ते १२०० मिलिग्रॅम कॅल्शियम आवश्यक असतं.
--भरपूर कॅल्शियम असलेले जिन्नस - दूध, योगर्ट, संत्र्याचा रस, चीज, हिरव्या भाज्या, मासे-शिंपले, फरसबी, ब्रोकली

                            ड जीवनसत्त्व---

--कॅल्शियम शोषलं जावं यासाठी ड जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. रोजच्या रोज साधारपणे १००० मिलिग्रॅम ड जीवनसत्त्व मिळायला हवं.
--ड जीवनसत्त्व मिळेल असे खाद्यपदार्थ - दूध, अंड्यातील पिवळा बलक, टुना आणि साल्मन मासे.

                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम )
               -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.10.2021-बुधवार.