"विश्व पोलियो दिवस"-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 02:17:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "विश्व पोलियो दिवस"
                                         लेख क्रमांक-3
                                    ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-२४.१०.२०२१-रविवार होता. कालचा  दिवस "विश्व पोलियो दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

                       2-संशोधन---

     पोलिओच्या विषाणू (व्हायरस)चे तीनही प्रकारचे जिवाणू हे 'आरएनए'वर्गीय असून, त्यांची नावे ब्रुनहिल्ड, लॅन्सिंग आणि लिऑन अशी आहेत. ब्रुनहिल्डमुळे अर्धांगवायू होतो. लॅन्सिंग आणि लिऑन मज्जारज्जूच्या पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे हातांपायांतील शक्ती जाऊन अपंगत्व येते. तिन्ही विषाणू फक्त मानवाला घातक आहेत. प्राण्यांना पोलिओ (आणि देवीच्या) विषाणूंचा काही त्रास होत नाही. फ्रॅंकलिन रुझव्हेल्ट हे १९३३ ते १९४५ सालापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी पोलिओच्या संशोधनासाठी प्रोत्साहन आणि निधी उपलब्ध करून दिला. ते स्वतःच पोलिओग्रस्त होते आणि तेथे त्याकाळी पोलिओग्रस्तांचे प्रमाण खूप होते. पिटसबर्ग युनिव्हर्सिटीचे प्रो. जोनास सॉल्क यांनी १९५१मध्ये पोलिओचे विषाणू शोधले आणि त्यांच्यापासून लस तयार केली. त्यांच्या लशीमध्ये पूर्णत: निष्प्रभ विषाणू होते. अल्बर्ट सॅबिन यांनीही न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये १९६१मध्ये पोलिओची लस तयार केली. त्यामध्ये तिन्ही प्रकारचे, पण अर्धवट विकलांग, क्षीण विषाणू होते. ही लस "टोचावी' लागत नव्हती. ती चवीला गोड होती. तिचे दोन थेंब तोंडाने घ्यायचे होते. त्यासाठी डॉक्‍टरांची उपस्थिती गरजेची नव्हती.

     भारतातील प्रशिक्षित स्वयंसेवक बालकांना लशीचे दोन थेंब देत असे. मुख्य म्हणजे या लशीचा प्रभाव जन्मभर टिकणारा आहे. पल्स पोलिओचा डोस द्यायच्या दिवशीच काही बालके रेल्वे आणि बसच्या प्रवासात असत. अशा वेळी स्वयंसेवक गाडीत शिरून चटकन पोलिओच्या लशीचे थेंब बालकांच्या जिभेवर ठेवायचे. एकूण पाच डोस द्यायची योजना होती. त्यात खंड पडू नये, म्हणून उत्साही तरुण स्वयंसेवकांनी मनोभावे या मोहिमेत भाग घेतला. सव्वाशे कोटी लोकसंख्या, अस्वच्छता, पाणीटंचाई, अंधश्रद्धेचा पगडा, खडतर हवामानाचे उंच-सखल भूभाग, पर्वतीय-वाळवंटी प्रदेश असे अडथळे पार करून भारत पोलिओमुक्त झालाय. जगातील ८० टक्के नागरिक आता "पोलिओविरहित' देशांमध्ये राहतात.

                         3-कारणे आणि लक्षणे---

     आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क झाल्याने पोलिओ पसरतो. क्वचित रुग्णाच्या विष्ठेने दूषित झालेले अन्न आणि रुग्णाच्या लाळेशी संबंध आल्याने पोलिओ होऊ शकतो. थोडक्यात पोलिओ दूषित पाणी आणि अन्नामधून पसरतो. घाण गटारी, आणि दूषित अन्न यामधून पोलिओचा प्रसार होतो. तोंडावाटे शरीरात शिरलेल्या विषाणूची पुढील वाढ घशातील लसिका ग्रंथीमध्ये होते. एक आठवडाभर विषाणू येथेच असतो. या कालखंडामध्ये विषाणू अन्नमार्गाच्या रक्त आणि रसवाहिन्यामधून शोषला जातो. त्याची पुढील वाढ येथेच होते. यास सर्वाधिक सतरा आठवड्यांचा काळ लागतो. एकदा षोषला गेल्यानंतर विषाणू शरीरभर पसरतो. शरीरामधून मज्जारजू आणि केंद्रीय चेतासंस्थेमध्ये त्याचा प्रवेश होतो. एकाकडून दुसऱ्याकडे विषाणू पसरण्याचे एक कारण म्हणजे अस्वच्छ हात. जेवण्यापूर्वी जेवल्यानंतर, शौचानंतर हात घुतल्याने पोलिओ विषाणूचा प्रसार थांबतो. जोपर्यंत विषाणू घाणीत आहे तोपावेतो विषाणू घशात किंवा शौचामध्ये जिवंत राहतो. आजाराचे दृश्य परिणाम दिसण्यास तीन ते एकवीस दिवस लागतात.पण लक्षणे दिसू लागल्यानंतर सात ते दहा दिवसात पोलिओ होतो. विषाणू संसर्गाच्या दोन पद्धती आहेत. एक सौम्य आजार निर्माण करणारा आणि एक गंभीर आजाराचा . (पक्षाघातनज्य आणि पक्षाघात विरहित). सौम्य आजार 80-90% टक्के व्यक्तीना होतो. बहुतेक रुग्ण लहान मुले असतात. आजाराच्या लक्षणामध्ये थोडा ताप, अशक्तपणा, घसा खवखवणे आणि उलट्या होतात. ही लक्षणे विषाणू संसर्ग झाल्यानंतर तीन ते पाच दिवसात दिसू लागतात. सौम्य आजार २४ ते ७२ तासांत बरा होतो. पूर्वीच्या सौम्य आजाराची लक्षणे आधी दिसत असल्यास गंभीर स्वरूपाचा पोलिओ होतो. शक्यतो मोठ्या वयाच्या मुलाना आणि प्रौढाना गंभीर आजार होतो.

  --विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
-------------------------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग/विकी)
              ---------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.