"विश्व पोलियो दिवस"-लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 02:20:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          "विश्व पोलियो दिवस"
                                              लेख क्रमांक-4
                                         --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-२४.१०.२०२१-रविवार होता. कालचा  दिवस "विश्व पोलियो दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

     पोलिओची लागण झालेल्या १० टक्के व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी, मान आखडणे, पाठीत वा मानेमध्ये वेदना सुरू होतात. ही लक्षणे दिसण्याचे कारण म्हणजे मेंदूआवरण दाह. मेंदूआवरण मज्जारज्जू आणि मेंदूवरील चिवट आवरण आहे. या प्रकारास 'आसेप्टिक मेंनिंजायटिस' म्हणतात. याला आसेप्टिक म्हणण्याचे कारण म्हणजे हा मेंदूआवरण दाह विषाणूजन्य किंवा जिवाणूजन्य आहे. थोड्या दिवसात यामधून रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
एक टक्का रुग्णामध्ये आजार गंभीर स्थितीमध्ये जातो. त्याला पोलिओ होतो. दोन ते तीन दिवस त्याला कोणतीही पोलिओची लक्षणे जाणवत नाहीत. पोलिओची पूर्वलक्षणे न दिसता एकाएकी पोलिओ होण्याआधी तीव्र डोकेदुखी, पाठदुखी आणि मानदुखी सुरू होते. पोलिओ विषाणूच्या तडाख्यात मुख्य प्रेरक चेता आल्याने ही लक्षणे दिसतात. स्नायूंच्या हालचालीस या प्रेरक चेता कारणीभूत आहेत. विषाणूमुळे चेतांचा दाह आणि चेता नष्ट होतात. स्नायूना प्रेरक संवेद न मिळाल्याने स्नायू दुर्बल, शिथिल होतात. याचा शेवट स्नायूंच्या पक्षाघातामध्ये होतो. स्नायूंचा सामान्यपणा नष्ट झाल्याने अवयव शिथिल होतात. .काहीं दिवसानी स्नायू आकाराने लहान होतात. अशी स्थिती शरीराच्या दोन्ही बाजूस असल्यास द्विपारश्वसममित आणि एकाच बाजूस असल्यास एका बाजूचे अवयव काम करीत नाहीत. पक्षाघात झालेल्या अवयवामधील संवेदनामध्ये फरक पडत नाही.

     पोलिओ विषाणूचा प्रवेश मज्जास्तंभामध्ये (मेंदू आणि मज्जारजू याना जोडणारा मेंदूचा महत्त्वाचा भाग) झाल्यास रुग्णाचे श्वसन आणि गिळण्यास त्रास होतो. मज्जास्तंभावर तीव्र परिणाम झाल्यास ह्रदयक्रिया रक्तदाब यावर परिणाम होतो आणि मृत्यू ओढवतो.
पक्षाघाताची शेवटची स्थिति थोड्याच दिवसामध्ये येते. ज्या चेतावर विषाणूचा प्रभाव पडला नाही त्या बिघाड झालेल्या चेतांचे कार्य आपापल्या परीने सुधारून घेतात. त्यांच्या नव्या शाखा नष्ट झालेल्या चेतांचे कार्य करतात. सुदैवाने चेतापेशी पूर्णपणे नष्ट झालेल्या नसल्याने महिन्याभरात प्रेरक आणि संवेदी चेता कार्य करू लागतात. सहा महिन्यांच्या काळात रुग्ण पूर्ण बरा होतो. चेतापेशीवर कायमचा परिणाम झाला असल्यास कायमचा पक्षाघात राहतो.

                        4-निदान---

     ताप आणि असममित स्नायू शिथिलता व पक्षाघात संवेदी चेतांचे कार्य चालू असणे हे पोलिओचे लक्षण आहे. लहान मुले किंवा तरुणामधील या लक्षणानंतर कमरेच्या पोकळीमधून मज्जारजूभोवती असलेल्या मेरुद्रवाच्या परीक्षणामध्ये वाढलेल्या पांढ-या पेशी आणि जिवाणू न दिसल्यास आसेप्टिक मेंदूदाहाचे निदान होते. पक्षाघातविरहित पक्षाघातविरहित पोलिओचे निदान होत नाही. घशातील पेशींचे किंवा शौच परीक्षणामधून पोलिओ संबंधित प्रतिपिंड परीक्षण केल्यासच पोलिओचे निदान पक्के होते.


--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग/विकी)
              ---------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.