"विश्व पोलियो दिवस"-लेख क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 02:22:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "विश्व पोलियो दिवस"
                                            लेख क्रमांक-5
                                        -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-२४.१०.२०२१-रविवार होता. कालचा  दिवस "विश्व पोलियो दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

                   5-लसीकरण---

     जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्त्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वीरीत्या शोधून काढली. या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूंमार्फत टोचून दिले जात. पुढे, अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली.
पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विषाणूंना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत .या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले की मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे ही जागतिक पोलिओ निर्मूलनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा की गेल्या २० वर्षांमध्ये पोलिओच्या रुग्णांची संख्या ३,५०,००० रुग्णांपासून १५०० रुग्णांपर्यंत खाली आली आहे. १९५८ साली भारतातील National Institutes of Healthने 'जिवंत पोलिओ लसींवर' एक विशेष समिती नेमली. या समितीने माकडांना विविध लसीं देत प्रयोग करून त्या लसींची पोलिओ जिवाणूंना प्रतिकार करण्याची क्षमता तपासली. या प्रयोगांच्या निकालांवरून सबिन यांच्या लसी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झले व सर्व देशांमध्ये ह्या लसींचा वापर करावयाचे ठरले.

                     6-इम्युनायझेशन---

     १९५० साली विल्यम हॅमोन यांनी पोलिओ रुग्णांच्या रक्तातून गामा ग्लोब्युलिन काढून त्यावर संशोधन केले. हॅमोन यांनी असे सांगितले कि हे गाम्मा ग्लोब्युलीन्मध्ये पोलिओ विरुद्ध प्रोटीन्स आहेत आणि हे गामा ग्लोब्युलीन पोलिओ विरुद्ध आपण वापरू शकतो

                   7-साथींचा अभ्यास---

     पोलिओ हा रोग अजूनही साऊथ आशिया आणि आफ्रिका मध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो . १९५० मध्ये पोलिओच्या लसीच्या जागतिक स्तरावरील प्रसिद्धीमुळे पोलिओ रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली .१९८८ मध्ये World Health Organisation ,UNICEF आणि Rotary Foundation या संस्थांनी सुरु केलेल्या कामामुळे जागतिक स्तरावरील पोलिओ निर्मूलनाचा प्रयत्न यशस्वी होत आहे .

                    8-उपचार---

     पोलिओवर नेमके उपचार नाहीत. फक्त लक्षणावरून उपचार करण्यात येतात. रुग्णास वेदना कमी करता येतील आणि स्नायूंना आराम मिळेल एवढे उपचार शक्य आहेत. श्वास घेण्यासाठीच्या स्नायूवर परिणाम झाला असल्यास कृत्रिम श्वासयंत्रावर रुग्णास ठेवावे लागते. पोलिओचे नक्की निदान झाले असल्यास रुग्णास कडक बिछान्यावर झोपविण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण बरा होत असता भौतिक चिकित्सा आणि उपचारांचा रुग्णास फायदा होतो.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
-------------------------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग/विकी)
              -----------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.