"विश्व पोलियो दिवस"-लेख क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, October 25, 2021, 02:25:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "विश्व पोलियो दिवस"
                                             लेख क्रमांक-6
                                       ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      काल दिनांक-२४.१०.२०२१-रविवार होता. कालचा  दिवस "विश्व पोलियो दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

                       9-पूर्वानुमान---

     पोलिओ सौम्य असल्यास किंवा आसेप्टीक मेंदूदाहाचे निदान झाल्यास रुग्णाच्या पूर्ण बरे होण्याची शक्यता असते. गंभीर स्वरूपाचा पोलिओ झाल्यास पन्नास टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात. 25% रुग्णामध्ये थोडा परिणाम शिल्लक राहतो. पण उरलेल्या 25% रुग्णामध्ये गंभीर विकृति शिल्लक राहते. गंभीर आजार झालेले 1% रुग्ण मरण पावतात. स्नायू दुर्बलता पहिल्या सहा महिन्यात पूर्ववत होते. रुग्णामधील सुधारणा दोन वर्षापर्यंत होत राहते. नुकताच पोलिओचा आणखी एक प्रकार उजेडात आला आहे त्यामध्ये पोलिओनंतर अनेक वर्षे स्नायू दुर्बल होत राहतात. स्नायूची शक्ती या आजारात हळू हळू कमी होत जाते. प्रतिबंध-पोलिओपासून संरक्षण मिळवण्याचे दोन मार्ग आहेत. पोलिओच्या दोन लसी मुळे पोलिओच्या विषाणूविरुद्ध प्रतिपिंड तयार होतात. लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये कायमची आयुष्यभरासाठी प्रतिकारशक्ती हे याचे वैशिष्ट्य आहे.

     सॅबिन लस ही तोंडाने घेण्याची पोलिओप्रतिबंधक लस आहे. लहान बालकाना ही तीन डोसमध्ये देण्यात येते. या लसीमध्ये दुर्बल पोलिओच्या विषाणूचा वापर केला आहे. पुढील आयुष्यात पोलिओपासून या लसीने संरक्षण मिळते. या लसीमध्ये जिवंत पण दुर्बल पोलिओ विषाणूंचा वापर केला असल्याने ज्या व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती क्षीण आहे अशा व्यक्तीमध्ये पोलिओ सारखी लक्षणे उद्भवू शकतात. असा प्रकार क्वचितच होतो. 68 लक्षडोसेस पैकी एका व्यक्तीमध्ये असा परिणाम दिसला आहे.

     साल्क लस ही मृत पोलिओ विषाणूपासून बनविलेली आहे. त्वचेखाली तीन इंजेक्शन्सच्या स्वरूपात ही लस द्यावी लागते. या लसीमध्ये जिवंत विषाणू नसल्याने लस दिलेल्या व्यक्तीमध्ये लसीमुळे प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. भविष्यकाळात पोलिओ विषाणूशी संपर्क आल्यानंतर रुग्णाचा पोलिओपासून बचाव होतो.

               10-इतिहास---

     पोलिओच्या परिणामांचे ज्ञान आदिमानवाच्या काळापासून तयार झालेले आहे. इजिप्शियन कलाकृतींमध्ये पोलिओचे अवशेष सापडतात. पोलिओचे पहिले वर्णन मायकेल अंडरवुड यांनी १७८९ साली केले. ह्या आजाराला Infantile Paralysis असे नंतर म्हणण्यात आले. विसाव्या शतकाच्या आधी पोलिओ आजार सहा महिन्यांहून कमी वयाच्या मुलांना आगदी कमी वेळा होत असे. कारण त्याकाळी लोकाचे राहणीमान अतिशय खालावलेले होते आणि म्हणून लोकांना सततच पोलिओच्या विषाणूंशी संपर्क होता आणि म्हणून त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती परंतु विसाव्या शतकानंतर चांगल्या राहणीमानामुळे लहान मुलांना देखील पोलिओ रोग होऊ लागला. युरोपे व अमेरिकेमध्ये २० व्या शतकाच्या सुरुवातीला छोट्या प्रमाणात पोलिओची साथ आली होती. १९५०पर्यंत पोलिओने आपल्या साठीचे शिखर गाठले होते. पोलिओने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले. Itensive Care Medicine ची सुरुवात पण पोलिओ विरुद्ध चाललेल्या लढ्यातच झाली. पोलिओ रुग्णांना मदत करण्यासाठी ज्या मोहिमा काढण्यात आल्या त्या मोहिमा जगात पहिल्या मदत कार्य असणार्‍या ठरल्या. जे रुग्ण पोलिओमधून वाचले त्यांचे अवघे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या यशामागे पोलिओच खूप मोठा वाटा आहे. पोलिओ ही १९६०च्या दशकातली सर्वात मोठी गोष्ट बनली व त्यामुळे पोलिओवर काम करणारे शास्त्रज्ञ सर्वात प्रतिष्ठित झाले. Polio Hall of Fame ची सुरुवातही ह्याच कारणावरून झाली.

                        11-भारताचे शेजारी देश---

     पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा अपवाद वगळता भारताच्या आजूबाजूचे देश आता पोलिओमुक्त झालेले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांवर "तालिबान'कडून प्राणघातक हल्ले होतात. परिणामी ते देश पोलिओग्रस्त आहेत. विषाणूंना कोणत्याही देशाच्या सीमारेषांचे बंधन नसल्याने भारतासारख्या अनेक पोलिओमुक्त देशातील बालकांना म्हणूनच यापुढेही पोलिओची लस घ्यावी लागणार आहे.

                  12-पोलिओचा 'दुसरा' विषाणू हद्दपार---

     टाईप २ विषाणूचे पृथ्वीवरून १९९९मध्ये कायमचे उच्चाटन झाले. त्यामुळे २५ एप्रिल २०१६पासून जगात "टीओपीव्ही'ऐवजी "बीओपीव्ही' लस देण्यास सुरवात झाली आहे. याला भारताने "नॅशनल स्विच डे' म्हटले आहे.. "टीओपीव्ही' म्हणजे "ट्रायव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्‍सिन'. यामध्ये पोलिओच्या तिन्ही विषाणूंचा समावेश होता. "बीओपीव्ही'मध्ये टाईप २ (लॅन्सिंग) विषाणू नाही. म्हणून याला "बायव्हॅलंट पोलिओ व्हॅक्‍सिन' म्हणतात. "टीओपीव्ही'ची लस देणे ९ मे २०१६पासून पूर्ण बंद होईल.

--विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
------------------------------

               (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.विकिपीडिया.ऑर्ग/विकी)
              ---------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.10.2021-सोमवार.