"आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस"-लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, October 29, 2021, 05:26:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस"
                                           लेख क्रमांक-1
                                  ---------------------------
  मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक-२९.१०.२०२१-शुक्रवार  आहे. आजचा दिवस  "आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिवसाची संकल्पना, महत्त्व  व इतर माहिती.

   October 29---International Internet Day

"To remember the event of the sending of the first electronic message which was transferred from one computer to another in 1969."

     प्रादेशिक भाषांचा वाढतोय वापर- दरवर्षी १८ टक्क्यांनी वाढ इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक दबदबा आहे तो प्रादेशिक भाषांचा...

० प्रादेशिक भाषांचा वाढतोय वापर

० दरवर्षी १८ टक्क्यांनी वाढ

     इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक दबदबा आहे तो प्रादेशिक भाषांचा. त्यातही सर्वाधिक वापरकर्ते आहेत मराठी, बंगाली आणि तेलुगू हेच. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. आज असलेल्या 'जागतिक इंटरनेट दिवसा'निमित्त यावरच टाकलेली एक नजर...

     भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात बोलली आणि लिहिली जाणारी भाषा हिंदी आहे. मात्र, इंटरनेट वापराचा विचार करता मराठी, बंगाली आणि तेलुगू भाषकांचा दबदबा असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गुगलनं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, देशात ५० कोटी इंटरनेट युजर्स आहेत. त्यामध्ये अँड्रॉईड युजर्सकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेसंदर्भात पाहणी आणि अभ्यास करण्यात आला. त्यात ७३ टक्के युजर्स हे त्यांच्या स्थानिक भाषेतून ऑनलाईन डेटा सर्च करतात हे समोर आले. मराठी आणि बंगाली भाषकांकडून डिजिटल प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच या युजर्सकडून अधिक प्रमाणात प्रादेशिक भाषेचा वापर करण्यात येतो. इंटरनेटवरील माहितीचा सर्वाधिक उपयोग या युजर्सकडूनच केला जात आहे.

     प्रादेशिक भाषांत इंटरनेट वापरण्यामध्ये देशातल्या शहरी भागाच्या तुलनेत (६६ टक्के) ग्रामीण भागाने आघाडी घेतली (७६ टक्के) आहे. प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वर्षाला १८ टक्क्यांनी वाढत आहे.

                       हाच दिवस का?---

     २९ ऑक्टोबर हा 'जागतिक इंटरनेट दिवस' म्हणून जगभरात साजरा केला जातो. कित्येक दशकं अमेरिकेत आणि काही युरोपियन देशांमध्ये त्यासंबंधीचं संशोधन जोमानं सुरू होतं. अखेर, २९ ऑक्टोबर १९६९ रोजी इंटरनेटवरचा जगातला पहिला संदेश ऑनलाइन पाठवला गेला. म्हणूनच या २९ ऑक्टोबर या तारखेला 'जागतिक इंटरनेट दिवस' असं मानलं जातं.

              यासाठी होतो प्रादेशिक भाषेचा वापर---

मेसेजेस - १७ कोटी

मनोरंजन - १६ कोटी ७० लाख

सोशल मीडिया - ११ कोटी ५० लाख

ऑनलाइन बातम्या - १० कोटी ६० लाख

असा होतो प्रादेशिक भाषा युजर्सचा इंटरनेट वापर

डिजिटल पेमेंट - ४७ लाख

सरकारी सेवा - ४१ लाख

ई-शॉपिंग - ४२ लाख

डिजिटल क्लासिफाइड्स - २४ लाख

भारतातला इंटरनेटचा वापर

ई-मेल - ३६ टक्के

सोशल मीडिया - ७९ टक्के

सर्च इंजिन - ४३ टक्के

उत्पादनं - १३ टक्के

संगीत - ९ टक्के

                    इंटरनेट वापराविषयी काही गोष्टी---

- रोज इंटरनेटवर सर्च करण्यात येणाऱ्या संकल्पनांपैकी १६ ते २० टक्के संकल्पना या नवीन असतात.

- दिवसाला सुमारे २ कोटी ९४ लाख ई-मेल्स पाठवले जातात. यातील ९० टक्के स्पॅम असतात.

- दिवसाला सुमारे ३० हजार वेबसाइट्स हॅक होतात.

- गुगलवर विचारलेली माहिती सर्च करण्यासाठी गुगलकडून ०.२ सेकंदात १ हजार कम्प्युटर्सचा वापर केला जातो.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.10.2021-शुक्रवार.