"३१ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 31, 2021, 02:22:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

आज दिनांक-३१.१०.२०२१-रविवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "३१ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                   -------------------------


अ) ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

१८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

१९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

१९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

२०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

=========================================

ब) ३१ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१३९१: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

१८७५: भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

१८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)

१९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)

१९४६: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

=========================================

क) ३१ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)

१९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)

१९८४: भारताच्या ३र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

१९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून १८९२)

२००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)

२००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.10.2021-रविवार.