दुःखद चारोळ्या-"लालपरी दुःखाचे उसासे सोडतेय, कर्मचाऱ्यांना जीवन संपवताना पहातेय"

Started by Atul Kaviraje, November 01, 2021, 01:10:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

               विषय : ST कर्मचाऱ्यांची  गळफास  घेऊन  आत्महत्त्या
                             कोरोना  वास्तव  विदारक  चारोळ्या
      "लालपरी दुःखाचे उसासे सोडतेय, कर्मचाऱ्यांना जीवन संपवताना पहातेय"
   -----------------------------------------------------------------

(1)
हतबल  झालाय  "ST कर्मचारी"  चारी -बाजुंनी
कोरोनाने  ग्रासलंय  त्याचे  जीवन  दाही  दिशांनी
आता  एकचं  पर्याय  आहे  त्याच्याकडे  अंतिम ,
"आत्महत्त्या"  करायचीय ,नकोय  हे  जीवन  लाचार ,हीन -दीन .

(2)
कुटुंबाची  उपासमार  त्याला  पाहावत  नाहीय
मुलांच्या  शिक्षणाची  काहीही  सोय  नाहीय
उपाशीपोटी  झोपणाऱ्या , अनंत  दुःखे  सोसणाऱ्या ,
आपल्याच  माणसांचे  दुःख  त्याला  सहवत नाहीय .

(3)
कोरोनाच्या  विळख्यात  सापडलीय  "लाल -परीही"
तिची  चाके  राहिलीत  खिळून ,गती  तिची  थांबलीय
"लालपरीचा"  रंग  उडालाय  सारा , फिका  पडलाय ,
तीही  "कर्मचाऱ्यांच्या"  दुःखात  जणू  सामील  झालीय .

(4)
आज  तोच  "कर्मचारी"  बसवरच  "गळफास"  घेतोय
आपल्या  जीवनाचा  आधार  ती , तो  तिला  शेवटचे  पाहातोय
शेवटपर्यंत  प्रामाणिकपणे  साथ  देणाऱ्या  या  "लाल -परीला" ,
आपले  दुःख -गीत  ऐकवून , तो  शेवटचा  श्वास  घेतोय .

(5)
दिवाळीचा बोनस , वाढीव  पगार ,सरकार  नंतर  करतेय  जाहीर
त्यासाठी  अश्या  किती  कराव्या  लागतील  "आत्महत्त्या" ?
नेते  म्हणती , पाऊल  उचलू  नका  टोकाचे  कुणीही ,
पण  कारणीभूत  असते  परिस्थिती ,त्यांच्याकडे  दुजा  नसतो कोणता  मार्गही .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.11.2021-सोमवार.