II शुभ दिवाळी II - "लक्ष्मी पूजन"

Started by Atul Kaviraje, November 04, 2021, 05:59:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           II शुभ दिवाळी II
                                              "लक्ष्मी पूजन"
                                         -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.११.२०२१-गुरुवार आहे. शुभ दिवाळीची सुरुवात झाली आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजचा मंगलमय दिवस  म्हणजे "लक्ष्मी पूजन". वाचूया, या दिनाचे महत्त्व, माहिती, पूजा विधी, व्रत, आणि इतर महत्त्वाची माहिती.

         लक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम---

     लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत. लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी. तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत.

     लक्ष्मीपूजन करताना एका चौरंग घ्यावं. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन त्यात जरा गंगा जल मिसळून 80 टक्के पाण्याने भरुन घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून पाच आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे. कलशाभोवती ताजी फुलं सजवावी. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. परंतू पुस्तकाचे कव्हर चामड्याचे नसावं. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप लावा. उदबत्ती वापरु नये कारण उदबत्तीची बांबूची असल्याने पूजेत वापरु नये. पूजा स्थळी केससुणीची पूजा करावी.

     आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ऊँ महालक्ष्मयै नम: जप करु शकता. षोडशोपचार पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करावी.

             या दरम्यान विशेष काळजी घेण्यासारख्या गोष्टी---

या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावे.
श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे.
ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांच्या व्यवहार करु नये.
यारात्री अखंड ज्योत जळावी.
देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.वेबदुनिया.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2021-गुरुवार.