II शुभ दिवाळी II-चित्रपट गीत- "आली दिवाळी दिवाळी"

Started by Atul Kaviraje, November 04, 2021, 06:22:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II शुभ दिवाळी II
                                     --------------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.११.२०२१-गुरुवार आहे. शुभ दिवाळीची सुरुवात झाली आहे.  मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्री बंधू-भगिनीस दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, दिवाळीचे  एक चित्रपट गीत . 


                                    "आली दिवाळी दिवाळी"
                                  ------------------------


लावितें मी निरांजन तुळशीच्या पायापाशी।
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥

आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी।
घरोघरी जागविते माय मुलें झोपलेली॥

घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण।
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण॥

चार वरसांमागे होता हात तुझा अंगावरी।
कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी॥

आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा।
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा॥

तुझ्यामागुती बाबांनी दुःख दाखविले नाही।
त्यांच्या पंखात वाढलो तुझा भाऊ आणि ताई॥

तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते।
आणि दिवाळीच्या दिशीं तुझी आठवण येते॥

सासरीच्या या संसारीं माहेराची आठवण।
आठवती बाबा-भाऊ आणि दारीचं अंगण॥

अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी।
दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी॥

आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन।
जिथे उभे अंगणांत तुळशीचें वृंदावन॥

दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा।
कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा॥

शेजारच्या घरातली दळणाची घरघर।
अजूनही येती कानी आठवणींतून स्वर॥

आमच्या ग दारावरनं घोड्यांच्या गाड्या गेल्या।
भावांनी बहिणी नेल्या बीजेसाठी॥

=====================
गाणे : आली  दिवाळी  दिवाळी
मराठी  नाटक : वाहतो  ही  दुर्वांची  जुडी
गायिका : माणिक  वर्मा
संगीतकार : बाळ  कोल्हटकर
गीतकार : बाळ कोल्हटकर
=====================


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीकवितासंग्रह.इन)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2021-गुरुवार.