म्हणी-"कडू कारले तुपात तळले"-क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, November 12, 2021, 06:00:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कडू कारले तुपात तळले"

                                            म्हणी
                                         क्रमांक-72
                                  "कडू कारले तुपात तळले"
                                --------------------------

             कडू कारले आरोग्यासाठी गोड---

     एखाद्या आनंदाच्या प्रसंगी मेजवानी दिली जात असताना मेनूमध्ये कारल्याच्या भाजीचा समावेश केलेला कधी पाहिला आहे का? कारल्याची भाजी असते, ती खाल्ली जाते पण ते कडू असल्यामुळे सर्वांना नकोसे वाटते. विशेष म्हणजे कारले कायम कडूच असते. म्हणून मराठीत एक म्हण आहे 'कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच कडू.'

     हे सर्वांना नकोसे वाटणारे कडू कारले आरोग्यासाठी मात्र गोड असते. म्हणजे कारल्याची भाजी खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम गोड असतात. त्याच्यात असलेल्या फायटो रसायनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यात बेटा कॅरीटीन असल्यामुळे ते डोळ्यासाठी चांगले असते. दमा, बॉन्कॉइटीस आणि फॅरीजीटस् हे श्वसनाचे विकार दुरुस्त होण्यासाठी रोज कार्ल्याचा रस प्यावा. रस पिताना त्यात थोडा मध टाकावा म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल.

     झोपेतली नियमितता, कार्यक्षमतेचा अभाव यावर कारले हा उत्तम उपाय आहे. मधुमेहाची तीव्रता कमी करणे आणि पचनशक्ती वाढवणे यासाठीही कारल्याचा रस उपयुक्त ठरतो. पोट साफ होण्यास कारले गुणकारी ठरते.


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ माझापेपर.कॉम)
                      -----------------------------------------

                         कारले माहिती---

     कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी ते कडूच' अशी एक म्हण आपल्याकडे फार काळापासून प्रचलित आहे. परंतु याच कडू कारल्यास आपल्या आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये शरीराच्या वाढीस, पोषण व आरोग्य रक्षणासाठी असलेली खनिजद्रव्ये, जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असून ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते. कारले या फळभाजीचा उपयोग मधुमेहाचा विकार असणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह आटोक्यात येतो. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करणाऱ्याचे वजन कमी होते. कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. कडू तत्त्वामुळे शरीरातील कृमी कमी करता येतात.

     हा आशिया, आफ्रिका व कॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा एक वेल आहे. फुले एकलिंगी व पिवळी असून ५-१० सेंमी लांब, लांब देठावर येतात. कच्ची फळे हिरवी किंवा पांढरी व पक्की फळे गर्द नारिंगी, ५-१५ सेंमी लांब, लोंबकळणारी, विटीच्या आकाराची व चवीला कडू असून त्यांवर लहान मोठ्या पुटकुळ्या असतात. ती भाजीकरिता उपयुक्त असतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात. कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ फेसबुक.कॉम)
                    ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2021-शुक्रवार.