म्हणी-"कधी तुपाशी तर कधी उपाशी"

Started by Atul Kaviraje, November 15, 2021, 05:48:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कधी तुपाशी तर कधी उपाशी"

                                            म्हणी
                                         क्रमांक-74
                              "कधी तुपाशी तर कधी उपाशी"
                             -----------------------------


74. कधी तुपाशी तर कधी उपाशी
     --------------------------

--संiसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
--दररोज दिवस सारखा नसतो.
--पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे.
--परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
--परिस्थिती नेहमी सारखी राहत नसते. कधी संपन्नता म्हणजे श्रीमंती येते तर कधी विपन्नता म्हणजे दारिद्र्य येते.
--खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी -एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे
--सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते, त्यात चढउतार असतोच.
--कधी श्रीमंती तर कधी  गरीबी येणे.
--पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे.
--वाक्य वापर : मानवी जीवन म्हणजे कधी तुपाशी तर कधी उपाशी !
--स्पष्टीकरण : यातून अगदी टोकाचं जगणाऱ्या माणसांचं वर्णन आहे. उदाहरण म्हणजे नोकरी मध्ये सगळं मनासारखं मिळालं तर काम करेन नाहीतर बेरोजगार राहीन. शब्दशः अर्थ घेतला तरी समजेल जेवणात सर्व काही साजूक तुपाचं असेल तर जेवेन नाहीतर थेट उपाशीच.
-- स्पष्टीकरण : खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा अर्थ - एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे.
--His situation is not always the same. Sometimes prosperity and sometimes poverty.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.11.2021-सोमवार.