"ऑपरेशन परिवर्तनने परिवर्तन घडवलंय,हातभट्टी दारू विक्रेत्यांचे समुपदेशन केलंय"

Started by Atul Kaviraje, November 16, 2021, 12:56:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

      विषय:सोलापूर येथील गावातील हातभट्टी दारू विक्रेत्यांचे ऑपरेशन परिवर्तन
                 वास्तव- कोरोना, अवैध  हातभट्टी-दारू विक्री चारोळ्या
  "ऑपरेशन परिवर्तनने परिवर्तन घडवलंय,हातभट्टी दारू विक्रेत्यांचे समुपदेशन केलंय"
------------------------------------------------------------------------


(1)
कोरोनाने  काय  परिस्थिती  आणलीय  "सोलापूर"  ग्रामस्थांवर  ?
उपजीविकेचे  साधन  घेतलंय  हिरावून , गदा  आणून  नोकरीवर
नाईलाजाने  वळलेत  ग्रामस्थ , अवैध  "हातभट्टी  दारू -विक्रीकडे" ,
घर  चालवायचेय , लक्ष्य  आहे  फक्त  मुलांच्या  भविष्याकडे .

(2)
कळतं  नाहीय  त्यांना , हा  अवैध  धंदा  एक  गुन्हाच  आहे ?
पण  जाणून -बुजून  ते  तो  आजवर  हतबलतेने  करीतच  आहेत
आज  शासनाचे  "परिवर्तन  स्क्वाड"  त्यांच्या  सहकार्या  धावून  आलेय ,
या  दुष्ट -चक्र ,गर्तेतून  सोडविण्या  त्यांनी  ऑपरेशन ,समुपदेशन  सुरु  केलंय .

(3)
इतरही  अनेक  वैध  आहेत  मार्ग , उपजीविकेचे , पोट  भरण्याचे
समाज -विघातक , आयुष्य  बरबाद  करणारी  नको  ही  "हातभट्टी -दारू"
"ऑपरेशन  परिवर्तनने"  आपले  सर्वस्व  पणा  लावून ,ग्रामस्थांना  मदत  करून ,
त्यांच्या  जीवनी  आणलीय  सुस्थिती ,स्थिरता , नवं -आयुष्य  केलंय  सुरु .

(4)
ग्रामस्थांचे  करून  समुपदेशन ,"हातभट्ट्या"  कायमच्या  बंद  करून
त्यांना  सुधारण्याची  एक  दिलीय  संधी , पुन्हा  स्व -पायांवर  उभे  रहाण्या
"ऑपरेशन  परिवर्तनने"  जणू  परिवर्तनच  केलंय , त्यांचे  आयुष्यच  बदललंय ,
त्यांना  जगण्याची  एक  नवी  दिशा  देऊन , नवा  सूर्य  दाखवून .

(5)
आज  "सोलापूर -गाव" , दारू -मुक्त  गाव  म्हणून  ओळखलं  जातंय
आदर्श  घ्यावा  असेच  कार्य , काम  त्यांच्याकडून  होतंय
या  सर्वांपाठी  आहे  "ऑपरेशन  परिवर्तन" , शासनाचे  सदैव  कार्यरत ,
सलाम  माझा ,"परिवर्तन ऑपरेशनास" , कायापालट  झालाय  गावा -गावांचा  नख -शिखांत .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.11.2021-मंगळवार.