गरिबांचीदिवाळीचारोळ्या-"गरिबांना दिवाळीत आधार देऊया,त्यांची दिवाळी आनंदाची करूया

Started by Atul Kaviraje, November 18, 2021, 12:17:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

         विषय:पुणे  येथे  फुटपाथवरील  मुलांना  दिवाळीनिमित्त  अभ्यंग -स्नान
                               गरिबांची दिवाळी चारोळ्या
          "गरिबांना दिवाळीत आधार देऊया,त्यांची दिवाळी आनंदाची करूया"
      ---------------------------------------------------------------
               

(1)
फुटपाथवरील  या  मुलांचे  आज  कुणीही  नाही
हिरावून  घेतलंय  नियतीने  त्यांचे  आपले ,सर्वस्व ,आधारही
या  अनाथांचे , "गरीब"  मुलांचे  आपण  पालक ,आई -वडील  होऊया ,
या  "दिवाळीस"  त्यांना  हात  देऊन ,त्यांच्या  डोळ्यांत  प्रकाश  पाहूया .

(2)
खितपत , दुर्लक्षित , उपेक्षित  मुलांचे  फुटपाथवरील  जीवन
एक  वेळच्या  जेवणासही  मुकलेले , जगतात  चक्क  भीक  मागून
त्यांचाही  जीव  आहे , तीही  आहेत  माणसे , आपल्यासारखीच  हाडा -मांसाची ,
जीवनात  त्यांच्या  प्रकाश  आणूया , या  "दिवाळीत"  भावना  जपून  माणुसकीची .

(3)
खाऊला , फटIक्याला , गोडा -धोडाला  मुकली  आजवर  ही  मुले
त्यांची  "दिवाळी"  साजरी  करूया ,त्यांना  स्वाधार , मदतीचा  हात  देऊन
त्यांच्या  मुखावरले  न विरणारे  हास्य , डोळ्यांतला  आनंद  अगणित ,
समाधानाचं  देईल  आपणास , करुनी  आपलंI  आनंद  द्विगुणित .

(4)
दिल्याने  कमी  होत  नाही , उलट  वाढतच  जाते
इथे  तर  कोणीच  कोणाचे  नसते , नाती -गोती  नावालाच  असते
या  नसणाऱ्यांचेच  आपण  माता -पिता  होऊन ,त्यांना  जवळ  करूया ,
या  "दिवाळीचे"  औचित्य  साधून , त्यांच्याबरोबर  राहूया ,खाऊया ,खेळूया .

(5)
अभ्यंग -स्नानाने  या  मुलांची  "दिवाळी"  पहाट  मंगल करूया
स्वच्छ  नव्या  कपड्यांची ,फटाक्यांची ,मिठाईची  त्यांना  भेट  देऊया
आजवरच्या  त्यांच्या  डोळ्यांतले  उदासीनतेचे ,अगतिकतेचे  अश्रू  पुसून ,
या  "दिवाळी"  निमित्ते  त्यांना आपलेसे करून,त्यांच्या भविष्याचे पथ -प्रदर्शक  होऊया .



-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.11.2021-गुरुवार.