वास्तव चारोळ्या- "एक करतोय दुसऱ्याचे समर्थन,पहा यांचे बेताल नर्तन अन वर्तन"

Started by Atul Kaviraje, November 19, 2021, 12:55:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : मी  तुझे  समर्थन  करतो , तू  माझे  समर्थन  कर , आपण  दोघे  एकमेकांच्या  विधानांना  दुजोरा  देऊया.
                 वास्तव -भलतीकडेच भरकटत  जाणारी  विधाने  चारोळ्या
              "एक करतोय दुसऱ्याचे समर्थन,पहा यांचे बेताल नर्तन अन वर्तन"
--------------------------------------------------------------------------


(1)
कोणीतरी  उठतो ,काहीतरी  अद्वा-तद्वा  बोलतो ,पुन्हा  बसतो
हा  मामला  चार -दोन  दिवसांत  पुन्हा  बंद  पडतो
पण  हा  "समर्थक"  कसला  लबाड , लबाडच  नव्हे  तर  द्वाड -याड
बसलेल्याला  उठवतो , आणि  पुन्हा  मूळ  मुद्दा  उकरून  काढतो .

(2)
ऐरा  गैरा  नत्थू  येतो ,काहीतरी  अर्वाच्य  बरळतो , घरी जातो
मीडियाचा ,वर्तमानपत्राचा  त्याला  उचलून  धरीत , खूप  खप  होतो
बोलण्यात  नसते  सुसंगती ,सारीच  विसंगती ,उफ़राटाच  हा  प्रकार ,
पण  "समर्थक"  गप्प   का  राहील , त्याचा  लगेच  असतो  याला दुजोरा अन होकार  !

(3)
कुणीतरी ,कुठूनतरी ,कसातरी  उपटतो ,वाचाळत  बसतो ,बरळत  बसतो
केव्हातरीचे ,कधीतरीचे ,कोठेतरीचे  उतारे  घेत  विधाने  करीत  बसतो
बोलण्याला  अर्थ  नसतो ,वक्तव्य  निराधार असते , विचार-मती कुंठित झालेली असते ,
पण  त्याची  सोडाच , या  "समर्थकाची"  तर  विवेक -बुद्धीच  भ्रष्ट  झालेली  असते .


(4)
कुणीतरी  एक  उच्च -शिक्षित ,अशिक्षित ,अति -शिक्षित  काहीतरी  शिक्षा (धडा) देतो
त्याचा  वेळ  जात  नसतो ,त्यासाठी  तो  तेव्हाचे ,आजचे ,केव्हाचे  दाखले  देतो
जनतेला  भडकविण्याचे  काम  तो  विधानांतून  एकंदरीत  करीतच  असतो ,
पण  त्यापेक्षाही  वरचढ  असा  तो  समर्थक , त्या  आगीत  तेलच  ओतीत  असतो .

(5)
कुणीतरी  स्वतःला  अती -शहाणा  समजणारा ,उच्चभ्रू ,मती -मंद ,वेडा
आपल्या  वेडसर  चाळयाने ,हाव -भावाने ,अविर्भावाने  लोकांचे  लक्ष  वेधून  घेतो
त्यातच  त्याचे  "समर्थन"  करणारा  दुसरा  वेडा  त्यास  येऊन  मिळतो ,
आणि  पाहता -पाहता  वेडेपणाचा  कहर  सर्वत्र  पसरलेला  दिसून  येतो .

(6)
काय  झालंय  काय  "समर्थकांनो"  तुम्हाला , बुद्धी  भ्रष्ट  झालीय  का  तुमची  ?
स्वतःची  सारासार  विवेक -बुद्धीच  हरवून ,गमावून  बसलाय  का  तुम्ही  ?
अरे , वेळ  नाही  जात  तर , समाज -हित  करा , समाजात  घडवा  परिवर्तन ,
या  विक्षिप्त  बरळणाऱ्यांच्या  नादी  लागून ,त्यांचे  "समर्थन"  करून ,थांबवा  तुमचे  हे  वर्तन  अन  बेताल  नर्तन  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2021-शुक्रवार.