"गुरूनानक जयंती"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, November 19, 2021, 04:22:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "गुरूनानक जयंती"
                                            लेख क्रमांक-2
                                       --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.११.२०२१-शुक्रवार आहे. आज शीख धर्माचे संस्थापक, शिखांचे पहिले गुरु, गुरु नानक देव यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व शीख, कवी-कवयित्री बंधू-भगिनींना, या जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. या जयंतीनिमित्त वाचूया,लेख, महत्त्वाची माहिती, गुरुजींचा संदेश, शुभेच्छा, आणि इतर. 

         गुरूनानक जयंती माहिती, इतिहास---

गुरु नानक जयंती -
महिना :   कार्तिक.
तिथी :   पौर्णिमा.
पक्ष :   शुद्ध.

     भारतामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक राहतात. सण साजरे करतात. त्यामध्ये 'गुरू नानक जयंती' हा सण शीख धर्मीय लोक साजरा करतात. धार्मिक महत्त्व विविध धर्मसंस्थापकांनी तपश्चर्या करून, अभ्यास करून मानवी जीवनउद्धारासाठी स्वत:चा एक मार्ग आखला. तो त्यांनी इतरांना दाखवला. त्यातूनच एक धर्म बनला. प्रत्येक धर्माला एक संस्थापक लाभला. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक हे होत. त्यांची जयंती शीख बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. गुरू नानक यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी पंजाबमधील तळवंडी या खेडेगावात झाला.

     गुरू नानक हे ज्या वयात खेळायचे, त्या वयात गावात जी साधू-संत मंडळी येत, त्यांचा उपदेश ऐकत बसत. त्यांना चिंतन करण्याचा नाद लागला. पुढे मोठे झाल्यावर त्यांचे मन संसारात रमेना. त्यांनी फकीरत्व स्वीकारले. गुरू नानक हे उत्तम व उपजत कवी होते. त्यांनी अनेक रचना केल्या. त्यांची रचना जपजी' ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यांच्या एकत्रित काव्यरचना, पदे, 'गुरुग्रंथसाहिब' मध्ये समाविष्ट आहेत. गुरुग्रंथसाहिब हा शीख धर्मीयांचा पवित्र ग्रंथ आहे.

     शिखांच्या मंदिरांना 'गुरुद्वारा' म्हणतात. तेथे गुरुग्रंथसाहिबाची पूजा होते. हिंदू, मुसलमान, शीख ही सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. ही शिकवण गुरू नानक यांनी दिली. गुरू नानक जयंतीला शीखधर्मीय बांधव 'गुरुद्वारा' येथे जाऊन प्रार्थना करतात. पहाटेपासून गुरुद्वारामध्ये अनेक कार्यक्रम होतात. गुरुद्वाराला विद्युत रोषणाई करतात. पूजन, कीर्तनादी कार्यक्रम होतात. शीख धर्मीय बांधव जगाच्या कुठल्याही भागात असले तरी आपल्या आद्य गुरूंची जयंती आपल्या परंपरागत व धार्मिक पद्धतीने साजरी करतातच.

                     गुरूनानक जयंती ---

     "परमेश्वर एकच आहे. तो कोणत्याही एका धर्माचा नाही. जो भक्तिभावनेने त्याला शरण जातो, त्याला तो मिळतो. तो सर्वत्र आहे. सर्व मानव एकमेकांचे बंधू आहेत. जातिभेद निरर्थक आहे," असा अत्यंत मोलाचा उपदेश करणारे गुरुदेव नानक शीख पंथाचे संस्थापक-प्रवर्तक आहेत. शीख लोक नानकांना आपले धर्मगुरू मानतात. गुरुदेव नानकांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी लाहोरजवळील रावी नदीच्या तीरावरील तलवंडी या गावी झाला. शीख पंथाचे जे सण, उत्सव आहेत त्यांत al गुरुनानक जयंती हा सर्वाधिक महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी शीख बांधव गुरुदेव नानकांच्या प्रतिमेची मोठ्या थाटात मिरवणूक काढतात.

     गुरुद्वारात (प्रार्थना मंदिरात) प्रार्थना-प्रवचन, भजन, ग्रंथसाहेब या ग्रंथाचे पठण, लंगर इत्यादी कार्यक्रम होतात. या उत्सवात हिंदू लोक सुद्धा सहभागी होतात. नानकांच्या वडिलांचे नाव काळुचंद व आईचे नाव तप्ता. ते खत्री म्हणजे क्षत्रिय होते. नानकांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे नानांकडे झाला म्हणून त्यांना नानक असे म्हणतात. असे म्हणतात की नानकांच्या जन्माच्या वेळी सहा योगी, नवनाथ, बावन पीर, चौसष्ट योगिनी, चौऱ्याऐंशी सिद्धी व तेहेतीस कोटी देव त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्या वेळी हा मुलगा छत्रधारी, चक्रधारी होणार असून सर्वांनी याची पूजा करावी असा होणार आहे.

     हा एका परमेश्वराशिवाय कुणाचीही पूजा करणार नाही, असे भविष्य सांगण्यात आले होते. गुरुदेव नानक लहानपणापासूनच अत्यंत सात्विक, धार्मिक होते. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. साधुसंतांच्या संगतीत बसून चिंतन करण्यात, भजन करण्यात ते वेळ घालवीत. नानक सात वर्षांचे झाले तेव्हा त्यांना शाळेत घातले. त्यांनी हिंदी, संस्कृत व फारसी भाषांचा सखोल अभ्यास केला. नवव्या वर्षी वडिलांनी त्यांची मुंज केली; पण त्यांनी जानवे धारण करण्यास नकार दिला. त्या वेळी नानक म्हणाले, "मला वेगळ्या प्रकारचे जानवे हवे आहे. दयेचा कापस बनवा. त्यापासून संतोषाचे सूत काढा. त्या सुताला सत्याचा लेप द्या व त्यावर संयमाचे संस्कार करा. असे जानवे मला घाला, की जे कधी तुटणार नाही. मळणार नाही. जळणार नाही."


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगुरु.इन)
                   ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2021-शुक्रवार.