"गुरूनानक जयंती"-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, November 19, 2021, 04:24:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "गुरूनानक जयंती"
                                            लेख क्रमांक-3
                                       -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.११.२०२१-शुक्रवार आहे. आज शीख धर्माचे संस्थापक, शिखांचे पहिले गुरु, गुरु नानक देव यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व शीख, कवी-कवयित्री बंधू-भगिनींना, या जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. या जयंतीनिमित्त वाचूया,लेख, महत्त्वाची माहिती, गुरुजींचा संदेश, शुभेच्छा, आणि इतर. 

     नानकांचे शिक्षणातही मन रमत नसे. नानकांच्या या विचित्र वागण्याने लोक त्यांना वेडा समजू लागले. शिक्षणात नानकांचे लक्ष नाही हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यास घरची गुरे राखण्याचे काम सांगितले. परंतु नानक रानात गुरांना सोडून द्यायचा व देवाचे भजन करीत बसायचा. मग नानकाला व्यापारात गुंतविले. पण व्यापारासाठी दिलेले पैसे नानक गोरगरिबांना दान करीत असे. विक्रीसाठी आणलेल्या वस्तू गरजू लोकांना फुकट देत असे. चौदाव्या वर्षी नानकाचा विवाह झाला पण संसारातही ते रमेनात. एके दिवशी नानक घरादाराचा त्याग करून घरातन एकाएकी निघन गेले. वैन नदीच्या तीरावर ते तीन दिवस चिंतन करीत बसले. त्या तीन दिवसांत त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला. परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे त्यांना ज्ञान झाले.

     परमेश्वराने त्यांना नामपठणाचा, जप करण्याचा व ॐ हेच संतनाम आहे असा संदेश दिला. त्यानंतर नानकांनी कायमचा गहत्याग केला. भारतभर प्रवास करून त्यांनी सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. लोकांना उपदेश केला. प्रवचने केली. त्यांच्या दर्शनासाठी सर्व धर्म, पंथांचे- जातिपातीचे लोक येत. लोकांचे दुःख दूर करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मी हिंदू नाही – मुसलमान नाही, असे ते सांगत.

     जगात परमेश्वर एकच आहे. त्याचे नाव सत्नाम. तोच या सृष्टीचा निर्माता आहे. तो स्वयंभू आहे. परमेश्वर मीत नाही. म्हणन मर्तिपजा व्यर्थ आहे. त्याचे खरे रूप हृदयात आहे जातिभेद, धर्मभेद, पंथभेद खरे नाहीत. हा मूलमंत्र सांगून नानकाना जा नवान धर्म स्थापन केला त्याचे नाव शीख. नाम व गान, दान, स्नान, देवाची व मानवाचा सवा व ईश्वराचे स्मरण या पाच तत्त्वांवर नानकांनी भर दिला होता. परमेश्वर निगुण, निराकार, ॐकारस्वरूप आहे. तो सत श्री अकाल म्हणजे सर्वशक्तिमान आदिपुरुष आहे.

     तो सत्यस्वरूप असन अकाल म्हणजे कालातीत आहे. अनंत आहे. सर्वव्यापी आहे. यावर शीख बांधवांची गाढ श्रद्धा आहे. गुरुदेव नानक शांतीचे दूत होते. विश्वबंधुत्वाचे, सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते होते. मानवतेचे पूजक म्हणून त्यांनी केलेले कार्य फारच मोलाचे आहे. त्यांनी नुसत्या स्वतंत्र पंथाची स्थापना केली नाही तर त्या काळात विशेषतः उत्तर भारतात सामाजिक क्रांती घडवून आणली. संगत (धर्मसंघ) व लंगर (अन्नछत्र) यांचा पाया घालून जातिधर्मरहित सामाजिक परंपरा सुरू केली. शिखांचा पवित्र ग्रंथ ग्रंथसाहेब यात नानकदेवांची ९४७ पदे आहेत.

     अशा प्रकारे शीखपंथीयांचे साक्षात् देवच असलेले, हिंदुमुसलमानांना एकत्र आणणारे, जगाला प्रेमाचा संदेश देणारे गुरुदेव नानक यांनी १५३८ साली कर्तारपूर (सध्या पाकिस्तानात) येथे आपले अवतारकार्य संपविले. आपल्या मृत्यूनंतर हिंदुमुसलमानांत तंटे होऊ नयेत म्हणून नानकानी अगोदरच सर्व व्यवस्था करून ठेवली होती. माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरावर फुले वाहावीत. चोवीस तासांनंतर ज्यांची फुले टवटवीत राहतील त्यांनी माझे मृत शरीर घ्यावे.

     नानकांच्या या आदेशानुसार हिंदू व मुसलमान यांनी नानकांच्या मृतदेहावरील चादर दूर केली तेव्हा सर्व फुले टवटवीत होती. मात्र नानकांचा पार्थिव देह अदृश्य झाला होता. लोकांनी ती चादर अधी अर्धी वाटून घेतली. मुसलमानांनी तिचे दफन केले तर हिंदूंनी तिचे दहन केले. अशा या थोर अवतारी पुरुषाच्या जयंतीदिनी आपण सर्वांनीच त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या शिकवणुकीनुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे व 'सत् श्री अकाल' असे म्हटले पाहिजे.


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगुरु.इन)
                    ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2021-शुक्रवार.