"गुरूनानक जयंती"-शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 19, 2021, 04:27:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "गुरूनानक जयंती"
                                               शुभेच्छा                                         
                                        ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.११.२०२१-शुक्रवार आहे. आज शीख धर्माचे संस्थापक, शिखांचे पहिले गुरु, गुरु नानक देव यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व शीख, कवी-कवयित्री बंधू-भगिनींना, या जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. या जयंतीनिमित्त वाचूया,लेख, महत्त्वाची माहिती, गुरुजींचा संदेश, शुभेच्छा, आणि इतर. 

              गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा---

आज  गुरु नानक जयंती आहे. याचनिमित्ताने आपण आपल्या मित्र-मंडळींना शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकता.

     आज (१९-नोव्हेंबर) गुरु नानक जयंती (Guru Nanak Gurpurab) आहे. शीख धर्मीयांसाठी हा सर्वात मोठा सण आहे. या वेळी गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात शीख बांधव एकत्र येतात. दरवर्षी मोठ्या जल्लोषात शीख बांधव गुरु नानक जयंती साजरी करतात. यावेळी अनेक ठिकाणी सामूहिक भोजन देखील केलं जातं. पंजाबप्रमाणेच मुंबईत देखील अनेक ठिकाणी गुरु नानक जयंती साजरी केली जाते. पण यंदा गुरु नानक जयंतीवर देखील कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावेळी आपण एकत्र येणं टाळलं पाहिजे.

     मात्र असं असलं तरीही ऑनलाईनच्या युगात आपण गुरु नानक जयंती आनंद नक्कीच घेऊ शकतो. तसेच  एकमेकांना शुभेच्छा देखील आपण देऊ शकतो.

     दरवर्षी गुरु नानक जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी केली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे गुरु नानक जयंती साजरी करताना अनेक बंधनं पाळावी लागणार आहेत. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे आपणा सर्वांना अनिवार्य आहेच. तसंच कुठेही गर्दी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच केलेलं आहे. त्यामुळे यंदा गुरु नानक जयंती साधेपणाने साजरी करावी लागणार आहे.

      कोरोनामुळे गुरु नानक जयंतीचा उत्साह मात्र कमी होऊ देऊ नका. कोरोना संसर्गामुळे आपण एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा आपल्या मित्रमंडळींना नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Guru Nanak Gurpurab wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात. 

             द्या गुरु नानक जयंतीच्या खास शुभेच्छा !---

--शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.... तमाम शिख बंधु-भगिनींना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा !
--गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

--शीख धर्मीयांचे आद्य गुरु, गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन!
--गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

--एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
--गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

--वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फ़तेह।
--गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

--जगातील सर्व मानव समान आहेत असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा.
--गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

--एकता, श्रद्धा असा संदेश देणारे,शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक  जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा
--गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

--सर्व शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा
--गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

--रोहित गोळे
-------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                   -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2021-शुक्रवार.