"१९ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 19, 2021, 05:41:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.११.२०२१-शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "१९ नोव्हेंबर – दिनविशेष"
                                    ------------------------

               
अ) १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
    -----------------------------

१९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना.

१९६९: फूटबॉलपटू पेले यांनी १,००० वा गोल केला.

१९६९: अपोलो-१२ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

१९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.

१९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

१९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

२०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान..

=========================================

ब) १९ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१७२२: आधुनिक स्टेथॅस्कोपचे जनक लिओपोल्ड अॅव्हेल ग्रुबर यांचा जन्म.

१८२८: झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १८५८)

१८३१: अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)

१८३८: ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक केशव चंद्र सेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)

१८४५: भारतीय-इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक एग्नेस जिबर्ने यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९३९)

१८७५: प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ मे १९५०)

१८७७: व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९४७)

१८८८: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९४२)

१८९७: सह्याद्री ग्रंथांचे लेखक व कायदेपंडित स.आ. जोगळेकर यांचा जन्म.

१९०९: ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक पीटर ड्रकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)

१९१४: क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रामकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)

१९१७: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४)

१९२२: हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)

१९२८: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१२)

१९३८: टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमचे संस्थापक टेड टर्नर यांचा जन्म.

१९४२: केल्विन क्लेन इंक चे संस्थापक केल्विन क्लेन यांचा जन्म.

१९५१: हिंदी चित्रपट अभिनेत्री झीनत अमन यांचा जन्म.

१९७४: भारतीय अभिनेते आणि गायक अरुण विजय यांचा जन्म.

१९७५: मिस युनिव्हर्स आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुष्मिता सेन यांचा जन्म.

१९७६: ट्विटर चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांचा जन्म.

=========================================

क) १९ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
    ---------------------------

१८८३: जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८२३)

१९७१: मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक कॅप्टन गो. गं. लिमये यांचे निधन.

१९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स  यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)

१९९९: कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2021-शुक्रवार.