बाजार....

Started by राहुल, April 16, 2010, 10:07:16 PM

Previous topic - Next topic

राहुल

बाजार

हा दुखाचा बाजार कशाला ?
वेदनांचा हा व्यापार कशाला ?
माणसाला वस्तूंच्या ढिगार्यात लपवून,
हा पाठीमागून वार कशाला ?
पोकळ घोषणांचा आधार कशाला ?
अश्रू पुसण्याचा करार कशाला ?
माणसांचा मुडदा पडून,
न्याय असा हद्दपार कशाला ?
हा फांदीवर प्रहार कशाला ?
माणुसकीच्या जाती विरुद्ध
वणवा पेटवण्याचा हाहाकार कशाला ?
प्रत्येक व्यवहारासाठी भ्रष्ट्राचार कशाला ?
हा दुखाचा बाजार कशाला ?
हा दुखाचा बाजार कशाला ?

(कवी - अनामिक)

santoshi.world


gaurig