म्हणी-"कोल्हा काकडीला राजी"

Started by Atul Kaviraje, November 21, 2021, 07:07:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "कोल्हा काकडीला राजी"


                                            म्हणी
                                         क्रमांक-78
                                  "कोल्हा काकडीला राजी"
                                ------------------------


78. कोल्हा काकडीला राजी
    ----------------------

--क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
--लहान लहान गोष्टींनी खुश होणे .
--संस्कृतपर्यायः -क्षुद्र: क्षुद्रेण तुष्यति।
--छोट्याश्या गोष्टीनेही आनंदी होणे.
--लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात.
--काही माणसे क्षुद्र गोष्टीनेही आनंदी होतात.
-- क्षुद्र मनुष्य मामुली गोष्टीत खुश असतो.
--सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.
--छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होणे.
--क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात.
--लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात. क्षुद्र माणूस क्षुद्र मोबदल्‍याने संतुष्‍ट होतो.जेव्हां आपणामध्ये मोठा पराक्रम करून मोठा लाभ करून घेण्याची शक्ति नसते तेव्हां आपल्‍या आटोक्‍यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून राहाणें चांगले.
--क्षुद्र माणूस क्षुद्र मोबदल्‍याने संतुष्‍ट होतो. एकदां एक कोल्‍हा एका मळ्यात गेला. तेथे त्‍याने द्राक्षे वगैरे अनेक फळे पाहिली पण ती सर्व मांडवावर उंच असल्‍यामुळे त्‍याच्या आटोक्‍यात नव्हती, तेव्हां त्‍याची त्‍यास आशा सोडून द्यावी लागली. अखेरीस एका वेलावर एक काकडी होती व ती जड असल्‍यामुळे जमीनीवर आडवी पडली होती. तेव्हां आपणास तेवढीच पुरे म्‍हणून मनात आनंद पावून त्‍याने तीवर आपली भूक भागविली. जेव्हां आपणामध्ये मोठा पराक्रम करून मोठा लाभ करून घेण्याची शक्ति नसते तेव्हां आपल्‍या आटोक्‍यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून राहाणें चांगले.
--वाक्य वापर : भ्रष्टाचार अंगी मुरलेले कोल्हे काकडीलाही राजी होत असतात.
--Some people are happy with even the smallest thing.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.11.2021-रविवार.