म्हणी-"काखेत कळसा नि गावाला वळसा"

Started by Atul Kaviraje, November 25, 2021, 06:17:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "काखेत कळसा नि गावाला वळसा"

                                             म्हणी
                                          क्रमांक-81
                              "काखेत कळसा नि गावाला वळसा"
                             --------------------------------


81. काखेत कळसा नि गावाला वळसा
    -------------------------------

--हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
--भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
--जवळची वस्तु  शोधण्यासाठी दूर जाणे.
--संस्कृतपर्यायः - कटीकलशमन्वेष्टुं नगरे भ्रमणं यथा।
--एखादी गोष्ट स्वतःकडे असताना ती सगळीकडे शोधत बसणे.
--जवळ असलेली वस्तू सर्वदूर शोधणे.
--हरवलेली वस्तू स्वतःच्या जवळ असतानाही इतरत्र शोधणे.
-- हरवलेली वस्तु जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे.
--वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोध घेणे.
--आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे.
--Finding lost objects elsewhere even when they are close to you.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------

      काखेत कळसा गावाला वळसा(कथा क्रमांक-१)---
     -----------------------------------------

     उन्हाळ्याची सुट्टी म्हणून आजोबांनी तन्वी आणि तन्मय साठी'मराठी म्हणींचा' छान उपक्रम करायचा असे ठरवूनच टाकले होते. तशी इच्छा त्यांनी बच्चेकंपनीला बोलूनही दाखवली होती. आतासुटीचा एक आठवडा उलटला होता. आजोबांची योजना तयारचहोती त्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले.

     आज नेहमीप्रमाणे दोघे निवांत उठण्याच्या बेतात होते पणआजोबांचा कल्ला ऐकला आणि दोघेही डोळे चोळतच हॉलमधेआले. आजोबा त्यांचा 'न हरवलेला' चष्मा शोधत होते. सर्वजण-आई,बाबा,आजी शोधाशोध करू लागले तसे तन्वी आणि तन्मयहीनाखुशीनेच सामील झाले.

     "आजोबा,चष्मा तर तुमच्या डोक्यावरच आहे",काहीशा शोधाशोधी नंतर तन्मय मोठमोठ्याने हसून म्हणाला.

     "अरेच्चा! काखेत कळसा गावाला वळसा", आजोबा चष्मा मिळाल्याच्या खुशीत चटकन बोलले.

     एऱ्हवी प्रश्न विचारून भांडावून सोडणाऱ्या दोघांनी आजोबांच्याबोलण्याकडे दुर्लक्ष केले की त्यांना ती म्हण समजली या नवीनच गोंधळात आई-बाबा होते. सुट्टी म्हणजे मस्ती सोबतच सुटीचासदुपयोगही करायचा हा कुटुंबाचा मुलांसाठी 'नियम', याचा दोघांनाविसर पडला होता  हे त्यांना काही रुचले नव्हते.

     "हरकत नाही पुन्हा प्रयत्न करूया",आई-बाबांना असे चिंताग्रस्तपाहून आजोबा म्हणाले.

      दुसऱ्या दिवशी दोघेही मित्रांसोबत खेळायला निघाले.

     "मुलांनो, तुम्ही मला वाढदिवसाला दिलेला पेन बहुतेक हरवला असावा",आजोबा म्हणाले.

     तसे दोघे पळतच घरात आले. आजोबांना काय द्यावे म्हणजे ते खुश होतील यावर इतका विचार करून दिलेला पेन हरवला हे ऐकून मुलं कोमेजून गेली.

     दोन्ही मुलांनी खूप शोधाशोध केली. बाहेर मित्रमंडळी खेळ सुरूच करणार होते म्हणून त्रागा करत होते. थकून, रडवेले झालेले दोघेही सोफ्यावर बसले.

     आजोबांनी विचारणा केली, "संपला शोध?जरा धैर्याने विचार तर करा..."

     तसा मुळातच हुशार असलेला तन्मय पळतच त्याच्या रूममध्ये गेलाआणि ड्रॉवर मधून पेन घेऊन आला. सर्वच खुश झाले पण तन्मयमात्र काहीसा  ओशाळला होता. कारण पर्वा सकाळी  आईने सांगितलेली किराणा यादी करायला तो त्यानेच घेतला होता जो चुकून त्याच्याच ड्रॉवर मध्ये ठेवला होता. त्याला पर्वाचीच गोष्टआणि आज आपण विसरलोही याचे काहीसे वाईट वाटले.

     पण आजोबांच्या म्हणींच्या उपक्रमाची आठवण झाली तसे दोघे ही हसून एकसुरात म्हणाले,"अरेच्चा! काखेत कळसा गावाला वळसा..."

     इतरांनीही त्यांना हसून दाद दिली. आता खऱ्या अर्थाने 'नियम' आणि'उपक्रम' दोन्हीही पार पडले होते.

     तात्पर्य: आपल्या जवळच असलेली गोष्ट/वस्तू आपण दूरवर सर्वत्रशोधतो म्हणजे "काखेत कळसा गावाला वळसा." आपल्या विसरभोळ्यापणामुळे किंवा नकळत केलेल्या दुर्लक्षानेआपल्यासोबत इतरांनाही त्रास होणार नाही याची खबरदारी बालपणापासूनच घेणे पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतेआणि म्हणूनच कुटुंबानेही ही जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली पाहिजे.

--वर्ष  शिदोरे
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.11.2021-गुरुवार.