"२६ नोव्हेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, November 26, 2021, 04:29:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.११.२०२१-शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                   "२६ नोव्हेंबर – दिनविशेष"
                                  -------------------------


अ) २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

१९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.

१९४९: भारताची घटना मंजूर झाली.

१९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

१९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

१९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.

१९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

१९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.

१९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

२००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

२००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.

=========================================

ब) २६ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१८८५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७५)

१८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७७)

१८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

१९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)

१९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)

१९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)

१९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)

१९२३: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)

१९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)

१९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

१९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.

१९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

१९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.

१९३९: अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

१९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.

१९५४: एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २००९)

१९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.

१९७२: हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.

१९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

=========================================

क) २६ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८९९)

१९९४: मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९७)

१९९९: पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.

२००१: शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.

२००८: मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.

२०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)

२०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.11.2021-शुक्रवार.