जोगवाआंदोलनचारोळ्या-"आईचा जोगवा,जोगवा मागितो,सरकारकडून विलीनीकरणाचीअपेक्षाकरितो"

Started by Atul Kaviraje, November 29, 2021, 01:26:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

      विषय : तुळजापूर  येथे  ST कर्मचाऱ्यांचे  जोगवा  मागीत  आंदोलन .
    वास्तव -ST कर्मचाऱ्यांचे  विलीनीकरणासाठी  जोगवा  आंदोलन  चारोळ्या
    ST कर्मचाऱ्यांचे  आई  भवानीकडे  जोगव्यातून  मागणे  त्यांच्याच  शब्दांत .               "आईचा जोगवा,जोगवा मागितो,सरकारकडून विलीनीकरणाची अपेक्षा करितो"
--------------------------------------------------------------------
     

(1)
आई  तुझा  गोंधळ  मांडीला  होता , तू  आली  होतीस  गोंधळाला
दयाळू  तू ,कृपाळू  तू ,कनवाळू  तू , धावुनी  आलेली  अमुच्या  साहाय्याला
आई  पुन्हा  पदर  पसरतो , तुझा  "जोगवा"  मागितो  या  आंदोलनाला ,
आई  तुझा  "जोगवा"  मागितो , हो  प्रसन्न  पुन्हा  एकदा  आमच्या  "जोगव्याला" .

(2)
आमच्या  हाकांनी  सरकारला  यावी  जाग , जागावा  अनुराग
विलीनीकरणाचा  अमुचा  एकचं  नारा , पेटवितो  आम्ही  देवीचा  चिराग
"जोगवा"  देवीचा  मागुनी , आरती  देवीची  गाउनी , देवीला  बोलावितो  जागराला ,
पाव  गं  एकदा  तरी , येई  धावुनी  तू , आमच्या  या  "जोगव्याला" .

(3)
आज  तुझाच  आहे  आम्हा  आधार , तूच  आहेस  आमची  आई
पुत्राकडे  लक्ष  ठेव  सर्वदा , तूच  जगन -माता , सकळांची  माई
"जोगव्यातून"  आम्ही  गाऱ्हाणे  करितो ,धरितो  आग्रह  हक्कांसाठी ,
कृपावंत  तू ,अवघ्या  विश्वाची  जननी , रहा  सदैव  तू  अमुच्या  पाठी .

(4)
सरकारला  जाग  येईल  असे  काही  कर  गं  मIते  भवानी
दाटी  केलीय  आमच्या  नयनांत , भावनांनी  आणि  आसवांनी
"जोगवा"  गातो , "जोगवा"  मागतो , हा  भक्त -कर्मचारी  तुझ्या  नावाचा ,
हाकेला  धाव  तू ,भक्ताला  पाव  तू ,विलंब  न  करता  क्षणाचा .

(5)
काहीही  नाहीय  आमचे  मागणे , विलीनीकरणासाठीच  "जोगवा"  पुकारलाय
हक्क -अधिकार  मिळावेत  आमचेच  आम्हा , याचसाठी  संप  केलाय
आंदोलनाचा  नव्हता  विचार  कधी  मनाला  शिवलेला  आमच्या ,
प्रामाणिकपणे  वाहून  घेतले  होते  आजवर , आम्ही  सेवेस  जनतेच्या .

(6)
या  "जोगव्याच्या"  निमित्ते , आई  काढलीय  तुझी  आठवण
आई  भवानी  आपल्या  भक्तांची  कर  गं  तू , नित्य  पाठ -राखण
"जोगवा"  गाता  तुझा , अभावितपणे , हात  जोडुनी  जातो  तुजसी  शरण ,
वाचव  तूच  आम्हासी , होऊन  आमची  तारण ,कर  संकटाचे  हरण .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.11.2021-सोमवार.