चारोळ्या-"सेवा बरखास्तकरतेयसरकारआंदोलनकIरींची,होळीकरताहेतकर्मचारीनिलंबन पत्राची"

Started by Atul Kaviraje, November 30, 2021, 01:12:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


  विषय : ST कर्मचाऱ्यांचे  गांधी  STYLE -ने  आंदोलन . धुळे  येथे , ST कर्मचाऱ्यांनी  निलंबनाची  प्रत   जाळून , व  एकमेकांना  हार  घालून , सत्कार  करीत,  सरकार  निषेधाच्या  घोषणा  केल्या .
        वास्तव -ST कर्मचाऱ्यांचे  सेवा -बरखास्त , निलंबन  पत्र  आंदोलन  चारोळ्या
"सेवा बरखास्त करतेय सरकार आंदोलनकIरींची,होळी करताहेत कर्मचारी निलंबन पत्राची"
--------------------------------------------------------------------------


(1)
आंदोलना  उतरले  होते  ST कर्मचारी , हिरीरीने , स्वाभिमानाने
लढा  होता  त्यांचे  हक्क  मिळविण्या , अधिकार  प्राप्त  होण्या
सरकारही  दाखवतंय  अडून , त्यांना  प्रतिसाद  देत नाहीय , ऐकत  नाहीय ,
उलट , सेवा  बरखास्तीचे  "निलंबन  पत्र" , कर्मचाऱ्यांच्या  हाती  देतंय .

(2)
सलाम  माझा  हे  ST कर्मचाऱ्या  तुझ्या  बाणेदार  स्वाभिमानाला
ठाम  राहिलास  आपल्या  म्हणण्याला , कणखर  तू  शेवटपर्यंत
म्हणती , "निलंबन"  झाले  तरी  चालेल  आमचे ,आम्हाला  मान्य  आहे ,
आमच्या  बाजूने  लागेपर्यंत  निकाल , आमचा  संघर्ष  असाच  सुरु  आहे  !

(3)
बडतर्फीचे ,बरखास्तीचे ,"निलंबनाचे"  पत्र  मिळालय  त्यांना  सरकारचे
गौरवच  समजत  आहेत  ते , म्हणती  फळच  मिळालय  आम्हा  हे  आंदोलनाचे
जोवर  विलीनीकरण  नाही , तोवर  लाल -परी  रस्त्यावरून  धावणार  नाही ,
तुमच्या  या  कारवाईकडे , आम्ही  ढुंकूनही  पहात  नाही , होवो  काहीही .

(4)
जमलेत  सारे  "निलंबित"  ST कर्मचारी , पुन्हा  अनोख्या  आंदोलनासाठी  एकत्र
पेटवून  होळी , त्यात  देताहेत  आहुती  ते  आपले  "निलंबन  पत्र"
हार  घालुनी  एकमेकांना , ते  सत्कार  करिती , सन्मान  करिती ,
सरकार  विरोधी  जोरदार  घोषणा  देउनी , आपला  संताप  व्यक्त  करिती .

(5)
होतेय  "निलंबन  पत्राची"  राख , त्यांनी  पेटवलेल्या  आत्म -निर्भर  होळीत
जाळून  टाकलाय  त्यांनी  सरकारचा  नाकर्तेपणा , या  प्रदीप्त ,पेटत्या  अग्नीत
आंदोलनाने  आता  नवे  वळण  घेतलंय , पुन्हा  एकदा  नव्या  जोमाने ,
ते  म्हणती , आमचे  सारेच  प्रश्न  सुटतील , फक्त  या  विलीनीकरणाने .

(6)
आपला  संताप ,उद्रेक  जाळून  टाकताहेत  ST कर्मचारी , या  होळीत
काहीतरी  अशुभाची  आशंका , मनात  राहून -राहून  येत  आहे
या  होळीचा  वणवा  पेटण्यास  कितीसा  उशीर  लागेल , सारं  जाळून  टाकील ,
हे  आंदोलन  आता , शंकाच  उरली  नाही , ज्वालामुखीचे  उग्र  रूप  घेईल .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.11.2021-मंगळवार.