म्हणी-"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी"

Started by Atul Kaviraje, November 30, 2021, 05:55:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी"

                                             म्हणी
                                          क्रमांक-86
                              "खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी"
                             --------------------------------


86. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
    -------------------------------

--परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
--उत्तम वस्तू, गोष्टींचाच उपभोग घ्यायचा अन्यथा त्या वस्तुशिवाय राहण्याची तयारी ठेवIयची.
--संस्कृतपर्यायः - सुन्दरी वा दरी वा।
--परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने बिनधास्त वागणारा.
--एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे भोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे.
--एखाद्या गोष्टीबद्दल आग्रह धरणे.
--ही म्हण खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी अशी आहे.
     यातून अगदी टोकाचं जगणाऱ्या माणसांचं वर्णन आहे. उदाहरण म्हणजे नोकरी मध्ये सगळं मनासारखं मिळालं तर काम करेन नाहीतर बेरोजगार राहीन. शब्दशः अर्थ घेतला तरी समजेल जेवणात सर्व काही साजूक तुपाचं असेल तर जेवेन नाहीतर थेट उपाशीच.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.11.2021-मंगळवार.