चारोळ्या-"वेतन-वाढीचे गाजर सरकारने दाखविलेय,ST कर्मचाऱ्यांनी गाजर पूजेला लावलेय"

Started by Atul Kaviraje, December 01, 2021, 12:54:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : सरकारने  ST कर्मचाऱ्यांच्या  मागण्या  मान्य  करून  त्यांना  वेतन -वाढीचे  गाजर -आमिष  दाखविले . नंदुरबार  येथे , ST कर्मचाऱ्यांनी  याचा  निषेध  करीत , गाजराची  पूजा  केली , आणि  दापोली  आणि  बीड  येथे  हातातील  गाजर  दाखवीत  वेतन -वाढीविरुद्ध  घोषणा  देत  सरकार -विरोधी  आंदोलन  केले .
    वास्तव -ST कर्मचाऱ्यांची  वेतन -वाढ,  गाजर  पूजा  करीत,गाजर  दाखवीत  सरकारचा  निषेध  चारोळ्या .
    "वेतन-वाढीचे गाजर सरकारने दाखविलेय,ST कर्मचाऱ्यांनी गाजर पूजेला लावलेय"
--------------------------------------------------------------------------


(1)
आंदोलन  मिटतंय , ST कर्मचाऱ्यांच  असं  एकंदरीत  वाटत  होतं
"वेतन -वाढ"  करीत  सरकार  जणू  त्यांच्या  बाजूने  उभच  राहील  होतं
पण  त्यांना  काय  माहित  की  ते , फक्त  गळाला  लावायचे  आमिष  होतं ,
हे  तात्पुरते  "गाजर" -भक्ष -"आमिष" , सरकारने  त्यांच्या  गळी  उतरवलं  होतं .

(2)
उशिरा  का  होईना , ST कर्मचाऱ्यांच्या  हे  आलंय  लक्षातच
"वेतन -वाढ"  निमित्ते  सरकार  करतय , इतर  मागण्यांकडे  दुर्लक्षच
आज  हेच "गाजर"  हाती  घेऊन , "गाजर"  उंचावून  घोषणा  देत ,
त्यांनी  पुकारलंय , पुन्हा  हे  नवे  अनोखे  "गाजर"  आंदोलनचं .

(3)
"गाजराची"  होतेय  पूजा , "गाजराचा"  होतोय  उदो -उदो
"गाजर"  हाती  घेऊन  करिती  सरकारचा  निषेध , देऊन  घोषणा
नारे  देऊन  "विलिनीकरणाचे" , संतप्त  ST कर्मचारी  करताहेत  मागणे ,
"गाजराची"  पुंगी  नाही  वाजत , अन  ते  खाणारंही  नाही , आता  सरकारने  तरी  व्हावे  शहाणे .

(4)
आज  महाराष्ट्रभर  "गाजराची"  विक्री  होतं  होती  भरा-भर
ST बस  आगार  फुलून  गेलं  होते , लाल -गुलाबी  "गाजराच्या"  पेटयांनी
आज  "गाजराला"  चांगलाच  विक्री -भाव  मिळत  होता  "गाजर" -विक्रेत्यांना ,
ते  धन्यवाद  देत  होते , सरकारला  अन  पर्यायाने   ST कर्मचाऱ्यांना .

(5)
थोडक्यात  आटपू  नका , हे  "वेतन -वाढीचे"  "गाजर -आमिष"  त्यांना  दाखवून
एवढे  ते  खुळे  नाहीत , आहेत  ते  सरकारचे  प्रत्येक  पाऊल  समजून , उमजून
आंदोलन  न  थांबता , पुन्हा  एकदा  नव्याने  होईल  सुरु , ते  म्हणत  होते ,
हाती  "गाजर"  घेऊन , ते  अधिक  जोमाने , आपला  निषेध  दर्शवित  होते .

(6)
जोवर  "विलीनीकरण"  नाही , तोवर  आम्ही  थांबणार  नाही
"गाजर"  द्या  आम्हा , नाहीतर  कोणतेही  आणिक  दाखवा  "आमिष"
तुमच्या  गळाला  लागणार  नाही , तुमच्या  "आमिषाला"  फसणार  नाही ,
ST महामंडळाचे "विलीनीकरण" झाल्याशिवाय ,आम्ही बैठक (ठिय्या ),सोडणार नाही .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.12.2021-बुधवार.