"कोरोना पार्श्वभूमीवर पाऊले उचलताहेत, ST कर्मचारी कोरोना नियमांचे पालन करताहेत"

Started by Atul Kaviraje, December 02, 2021, 12:19:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : बीड  येथे  कोरोना  पार्श्वभूमीवर  ST कर्मचाऱ्यांनी , मास्कचे  वाटप  करीत  आणि  सोशल  डिस्टंसिंग  ठेवीत  अनोखे  आंदोलन  केले .
    वास्तव -कोरोना  पार्श्वभूमीवर  ST कर्मचाऱ्यांचे  नियम  पाळीत  आंदोलन  चारोळ्या
      "कोरोना पार्श्वभूमीवर पाऊले उचलताहेत,STकर्मचारी कोरोना नियमांचे पालन  करताहेत"
--------------------------------------------------------------------------


(1)
"कोरोनाचे"  सावट  आहे  अजूनही , नवं -नवीन  बदल  घडताहेत  त्यात
कडक  नियम  लागू  होताहेत , त्रिसूत्री  अजूनही  पाळल्या  जाताहेत
ST कर्मचाऱ्यांच्या  आंदोलनाने  पुन्हा  एकदा  घेतलंय  अनोखे  वळण ,
अंतर्भाव  झालाय  या  नियमांचाही  "कोरोना"  पार्श्वभूमीवर , कसोशीने  ते  पाळताहेत .

(2)
"मास्कच"  वाटप  होतंय , "सोशल  डिस्टंसिंग"  ठेवलं  जातंय , अंतर  राखलं  जातंय
आपल्या  आंदोलनात  त्यांच्याकडून  या  नियमांचेही  पालन  होतंय
जन -जागराचा  हा  एक  धडा , देताहेत  ते  आपल्या  या  आंदोलनातून ,
सोबत  विलीनीकरणाच्याही  देताहेत  घोषणा , ते  अधून -मधून .

(3)
ST कर्मचारी  गर्दी  टाळताहेत , अंतर  राखताहेत , नियम  पाळताहेत
सरकारच्या  नियमावलीनुसार , ते  प्रत्यक्ष  कार्यही  करून  दाखवताहेत
संपाला  एवढे  दिवस  होऊनही  ते , स्वतःशी  आहेत  प्रामाणिक ,
आत्म -विश्वासाचे  दुसरे  काही  उदाहरण  देता  येईल  का  याहून  अधिक  ?

(4)
विलीनीकरणाचा  एकचं  जप , मंत्र -घोष , त्यांच्या  घोषणांतून  निनादतोय
हेच  आहे  त्यांचे  भविष्य , त्यासाठीच  हा  अट्टाहास  होतोय
पण  इतके  होऊनही  त्यांनी  आक्रस्ताळेपणा  नाही  केलाय ,मर्यादा नाही ओलांडलीय ,
धैर्याची  परमोच्च  सीमा  गाठून ,त्यांनी  आपली  सोशिकताच  यातून  दाखवलीय .

(5)
हे  सर्व  करता  त्यांना  इतरेजनांचीही  आहे  सर्वथा  काळजी
नियमाचे  महत्त्व  ते  देताहेत  पटवून , लोकांना  करताहेत  ते  राजी
पण  होतं  नाहीत  आमच्या  मागण्या  मान्य , व्यक्त  करताहेत  ते  नाराजी ,
आता  सरकारच्याच  राहील  हातात , यापुढची  सारी  खेळी  अन  बाजी .

(6)
कौतुक  आहे  तुमचे  ST कर्मचाऱ्यांनो , मानले  तुम्हाला  बुवा
या  परिस्थितीतही  तुम्ही  देताय , "कोरोना"  नियमावलीचे  धडे , करून  जन -जागृती
जनतेसाठीच  तुम्ही  वाहून  घेतलंय ,तुमच्या  या  आंदोलनास  यश  मिळो ,
यशस्वी  व्हाल  तुम्ही , नक्कीच  मिळेल  सरकारकडून  या  विलीनीकरणास  स्वीकृती .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.12.2021-गुरुवार.