आंदोलन चारोळ्या- "अडला नारायण गाढवाचे पाय धरी,संपालाSTकर्मचारी गाढवाची पूजा करी"

Started by Atul Kaviraje, December 03, 2021, 12:23:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : अकोला  येथे  ST कर्मचाऱ्यांनी , गाढवाचे  पाय  धुवून ,हार  घालून ,पूजा  करून  अनोखे   आंदोलन  केले .   
                    वास्तव -ST कर्मचारी  अनोखे  आंदोलन  चारोळ्या
      "अडला नारायण गाढवाचे पाय धरी,संपाला STकर्मचारी गाढवाची पूजा करी"
--------------------------------------------------------------------------


(1)
म्हण  प्रचलित  होती  अन  आहेही , अडला  हरी  "गाढवाचे"  पाय  धरी
प्रत्यक्षात  पाहतोय  ती  आज  होताना  तंतोतंत  खरी
"गाढवांचे"  कळप  घेऊन  आलेत , ST कर्मचारी  ST बस  आगारी ,
अनोख्या  "गाढव" -आंदोलनाची  चाललीय , त्यांची  अजब  तयारी .

(2)
सरकार  अन  ST कर्मचारी यात  खरे  "गाढव"  कोण  ते  नाहीय  कळत
पण  "गाढवांची"  मात्र  होतेय  करमणूक , त्यांच्या  वर्तणुकीतून , नकळत
पाय  काय  धुताहेत ,पूजा  काय  करताहेत ,हार  काय  घालताहेत ,
वरताण म्हणजे , गोड -धोड  खाऊ  घालून  त्यांची  वरातही  काढताहेत .

(3)
या  "गाढव" -पूजेने  बधेल  का  हो  हे  अडेल -तट्टू  सरकार  ?
उलट  ST कर्मचाऱ्यांना  ते  "गाढवातच"  काढतील  फार -फार
कुठून  सुचलाय  हा  उपदव्याप , जणू  भूतदयाच  दाखवताहेत  ?
"गाढवाचे"  पाय  धुवून ,पुजून  नेमके  ते  काय  म्हणताहेत  ?

(4)
वर्षभर  मर -मर  ओझी  वाहणाऱ्या  "गाढवांना" , असा  एक  दिवस  तरी  मिळावा
त्यांच्या  श्रमाचे ,कष्टाचे  फळ  म्हणून , "गाढव" -दिन  साजरा  व्हावा
बैल -पोळ्याप्रमाणेच  त्यांचीही  होऊन  पूजा , त्यांना  नैवेद्याचा  घास  मिळावा ,
दुर्लक्षित  असा  हा  कष्टकरी  प्राणी , त्याचा  असाच  मान -सन्मान  व्हावा .

(5)
"गाढव"  घालीत  नाहीय  गोंधळ , करीत  नाहीय  गदारोळ
मुकाट्याने  करून  घेतंय  ते  सेवा , ST कर्मचाऱ्यांकडून , गप-चूप पणे   
काय  चाललंय  हे  कळण्याइतका  तो  शहाणा  नक्कीच  नाही ,
पण  ST कर्मचाऱ्यांच्या  या  (सद् ?) वर्तनाने , त्यांची  गणना  मात्र  "गाढवातच" होई !

(6)
असे  काही  करू  नका  ST कर्मचाऱ्यांनो , त्या  मुक्या  प्राण्यावर  दया  दाखवा
त्याला  त्याचे  काम  करू  द्या , राब -राब  राबायचेच  त्यांच्या  आहे  नशिबा
सरकारची  करमणूकच  होतेय , तुमच्या  या  वर्तनातून ,अनोख्या  आंदोलनातून ,
मूर्खातच  होतेय तुमची गणना,आता तरी शहाणे व्हा,आणि"गाढवासारखे" वर्तन  टाळा  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.12.2021-शुक्रवार.