म्हणी-"खोट्याच्या कपाळी गोटा"

Started by Atul Kaviraje, December 06, 2021, 06:05:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"खोट्याच्या कपाळी गोटा"


                                          म्हणी
                                       क्रमांक-88
                                "खोट्याच्या कपाळी गोटा"
                               ------------------------


        खोट्याच्या कपाळी गोटा ! False forehead!-लेख(भाग-२)---
       ---------------------------------------------------- 

     शहराच्या मध्यवर्ती वस्तीचा रस्त्याच्या लगत, लाखो रुपये बांधून उभारलेली हॉटेल लॉजिंग ही,लफडेबाज सावज टिपण्याचा तयारीत असतात.त्यांच्या हॉटेलमध्ये लावलेली नियमाची कायदेशीर पाटीही, बहुतांश वेळा धूळखात तशीच पडलेली असते. नेहमीच स्वच्छ आणि चकचकीत असणाऱ्या इथल्या मोठ्या दवाखान्यामध्ये पांढऱ्या शुभ्र वस्त्र मध्ये, वैद्यकीय सेवा सुविधा देणारी इथली पांढरीशुभ्र व्यवस्था,उपचाराची बिले घेण्यासाठी काळवंडलेल्या मनाने हात पुढे करत असतात. या साऱ्या पाठीमागं फिरताहेत इथले अर्थकारण पैशाचं कारण,ज्याला या व्यवस्थेची इथले मालक थांबवू शकत नाहीत.कारण यात प्रत्येकाचा हिस्सा ठरलेला आहे. यातल्या प्रत्येक विषयाची समान वाटणी दर दहा दिवसाला होते.शहराच्या आकर्षण या पाठीमागे शहरांमध्ये येण्याच्या पाठीमागे पैसा मिळवणे निव्वळ हाच एकमेव उद्देश असतो.

     याउलट खेडेगावांमध्ये वाड्या वस्तीमध्ये ग्रामीण भागांमध्ये,माणुसकी सांभाळली जाते. गावाकडच्या दिल्या जाणाऱ्या चहाच्या ओलाव्याचा घराच्या पाठी मागून उसने मागून आणलेली कप बर दूध,फार मोठा गोडवा देऊन जाते. लहान-मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतमळ्यात, मिळून,मिसळून होणारी शेतीची कामे, शहरा कडच्या कारखानदारी पेक्षा अतिशय सुनियोजित पद्धतीने,पर्यावरणाची काळजी घेत,वर्षानुवर्षे केली जाते.हजारो रुपये खर्च करत हॉटेलात जेवन जेवणावळी घालणाऱ्या पुढारी मंडळींच्या पेक्षा,गावाकडच्या जत्रेमध्ये वाढलं जाणारं तीन पटीने ताटातलं मटन,खाना-याला पुन्हा-पुन्हा येण्यासाठी,नकळत खुणावू लागतं. हिरव्या गार माळावरती जनावरांना मोकळीक सोडलेला तो चारा खाण्यासाठी चा वेळ,त्याच्या सोबतीला तो फिरणारा राखनदार,सारं काही आलबेल असतं. जन्माला आलेल्या घरातील बाळाला बघण्यासाठी आख गावच्या गाव झुंडीने उड्या मारतात, तर एकादा माणूस मृत्यू झाल्यानंतर, त्या ठिकाणी, आपापल्या हातातली कामे टाकून,निस्वार्थ मनाने त्याच्या उत्तरक्रिया ला जाणारे ती माणसं शेवटपर्यंत माणसं म्हणूनच जगतात. मात्र,खेड्यांना दुय्यम दर्जा देऊन,खोट्याच्या कपाळी गोटा मारणारी काळवंडलेली मने, शहर वस्ती मधल्या भरलेल्या खचाखच, गर्दी सारखी आहेत.


लेखक-श्री.तानाजी सखाराम कांबळे.
-------------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मी मराठी.कॉम)
                     -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.12.2021-सोमवार.