शाळाचारोळ्या-"चौकलेटचे वाटपहोतंय जोशात,विद्यार्थ्यांचे शाळेत परतण्याच्या आनंदात"

Started by Atul Kaviraje, December 07, 2021, 01:42:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय : अकोल्यात  शाळकरी  विद्यार्थ्यांचे  शाळेत  चौकलेट  वाटून  स्वागत .
            वास्तव -कोरोना  काळातही  सुरु  झालेल्या  शाळा - चारोळ्या
     शाळकरी  मुलांचे  पुनर्र -शाळा  आगमनाचे  व  कोरोना  आव्हानाचे  मनोगत .
      "चौकलेटचे वाटप होतंय जोशात,विद्यार्थ्यांचे शाळेत परतण्याच्या आनंदात"
  ----------------------------------------------------------------------


(1)
"कोरोनाने"  मारली  होती  बाजी , गेल्या  दोन  वर्षांत  उडवून  हाहाकार
बंद  खोल्यांत  कोंडून  सर्वांना , करीत  होता  स्वतःचाच  जयजयकार
आव्हान  देण्या  त्यास  आज  ही  चिमुरडी ,शाळकरी  मुले  उतरलीत  मैदानात ,
नाही घाबरत तुला,ती म्हणती,आजपासून जाणार आम्ही पुन्हा आमच्या "शाळांत",वर्गांत.

(2)
खूप  सोसलंय  दोन  वर्षे , "कोरोना"  तुला  आम्ही  खूपच  अनुभवलंय
"शाळेतील"  इतिहास ,भूगोल ,गणित ,शास्त्र  अभ्यास -क्रम  आम्ही  चुकवलाय
आता  नाही  वाट  पहाणार , ते  दिवस  आम्ही  पुन्हा  एकदा  पहाणार ,
आमच्या  "शाळेला"  लागलेले  टाळे  आम्ही , या  आमच्या  हातांनी  उघडणार .

(3)
आमचे  भविष्य  घडविणारी  ही  "शाळा"  कधीपासून  उदास ,निराश  आहे
आमच्यातील  सुजाण  नागरिक  पाहणारी  ही  "शाळा"  केव्हापासून  गप्प  आहे
आता  आम्हीच  तिचा  आवाज  होऊन , तिची  उदासी  दूर  करणार ,
आज  तिची  घंटा  आम्ही  स्वहस्तेच  वाजवणार , घंटानाद  करणार .

(4)
आता  तुझे  दिवस  गेलेत  "कोरोना" , तुझा  काळ  संपत  आलाय
आज  आमचे  दिवस  आलेत , आमचा  वर्तमान  आम्ही  आजपासूनच  घडवलाय
आता  परतूनही  फिरू  नकोस  मागे , लढा  तुझ्याशी  सुरूच  राहील ,
आमच्या  माय -मराठी  "शाळेस"  पुन्हा  एकदा , चांगले  दिवस  येतील .

(5)
पहा  आमचे  जोरदार  होतंय  स्वागत , "चौकलेटचे"  होतंय  'शाळेत"  वाटप
क्षणभरही  नको  थांबूस  इथे , नाहीतर  आम्ही  लावू  तुझी  वाटच
ही  "शाळाच"  आमचे  सर्व  काही , आई -वडील , बहीण अन  भाऊही ,
सर्व  विद्यार्थ्यांचे  अख्खे  कुटुंब  आहे  ही  "शाळा" , आहे  आमचे  सर्वस्वही .

(6)
आम्हाला  आमचा  धडा  गिरवू  दे , आम्हाला  तो  फळ्यावर  लिहू  दे
या  डोळ्यांनी  "शाळेचा"  तो  दिमाख ,ते  रूप  पुन्हा  एकवार  पाहू  दे
तुझ्या  काळात  वंचित  असलेले ,राहिलेले , शिक्षण  आम्हा  पूर्ण  करू  दे ,
या  चिमुरड्या  निर्भय ,निडर छातीने  येतोय तुजपुढे,आमच्या या आव्हानास तू उत्तर दे.



-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2021-मंगळवार.