म्हणी-"गरजवंताला अक्कल नसते"

Started by Atul Kaviraje, December 07, 2021, 03:44:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -"गरजवंताला अक्कल नसते"


                                            म्हणी
                                         क्रमांक-89
                                "गरजवंताला अक्कल नसते"
                               --------------------------


89. गरजवंताला अक्कल नसते
    ------------------------

--गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
--गरजू व्यक्तिला दुसऱ्याचे बोलणे व वागणे हवे तसे न कIही बोलता सहन करावे लागते.
--ज्याला गरज असते त्याला इतरांचे मानहानीकारक बोलणे ही ऐकून घ्यावे लागते.
--असहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो.
--गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.
--एखाद्या संकटात सापडलेल्या गरजवंताला दुस-यांचे वाईट बोलणेही ऐकून घ्यावे लागते.
--गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.
--गरज असेल तर दुसऱ्याचे हवे तसे बोलणे निमूटपणे सहन करावे लागते.
--गरजू माणूस वाटेल ते दूषण लावून घेण्यास व बोलणी ऐकण्यास साहजिक तयार असतो. तो अगतिक बनतो व शहाणा असून मूर्ख ठरतो. (गो.) गरजेक अक्‍कल ना. ''प्रवासांत शिष्‍य तोच चाकर, तोच स्‍नेही, सर्व तोच असला म्‍हणजे संग्रहास अयोग्‍य अशा मनुष्‍याचे अपराधसुद्धां पोटात घालून 'गरजवंतास अक्‍कल नाही' ही म्‍हण खरी करून दाखवावी अशी बुद्धि होते.''-शाब. १.१७.
--वाक्य वापर : खाजगी नोकरी करणाऱ्या गरजवंताला अक्कल नसते.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2021-मंगळवार.